*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*भारतरत्न लता दिदी* 🌹
भारतरत्न लता दिदी
संगीताचा तारा
अवर्णनीय, सदाबहार
कोहिनुर हिरा
गानकोकिळा तुला मान
भारताची तु शान
स्वरसाम्राज्ञी तुच गान
गोड गळा गाणी छान
मंगेशकरांची तु लेक
साधी रहाणी,स्मित हास्य
भावंडांचा आधार स्तंभ
सप्तसुरांचे तुझे रहस्य
सारेगमचा अनमोल ठेवा
संगीत क्षेत्राची केली सेवा
पुरस्कारांचा मिळाला मेवा
सकलांच्या मनी तुझाचं हेवा
*सा रे ग म प ध नी सा*
सप्तसुरांची तु अधिपती
दुर्मिळ कस्तुरी, सुगंधी मोगरा
रफी, मुकेश, किशोरची सोबती
*शीला पाटील. चांदवड.*