You are currently viewing मराठी साहित्य रसिकांना साहित्यिक मेजवानीचा आस्वाद घेण्याचे आवाहन

मराठी साहित्य रसिकांना साहित्यिक मेजवानीचा आस्वाद घेण्याचे आवाहन

मुंबई :

*मराठी साहित्य रसिक मंडळ चेंबूर व श्री. ना.ग.आचार्य व श्री. दा.कृ. मराठे महाविद्यालय चेंबूर* यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्र. दि.०७ व शनि.०८ फेब्रुवारी २०२५ रोजी या दोन्ही दिवशी दु.०३ ते ०७ या वेळेत मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. सदर संमेलनात *सुप्रसिद्ध लेखिका प्रतिभा सराफ यांची श्री. घन:श्याम परकाळे निर्मित व दिग्दर्शित ‘नाती’ ही एकांकिका* तसेच *अयोध्येची उर्मिला* या कादंबरीच्या लेखिका *डॉक्टर स्मिता दातार* यांची मुलाखत तर दुसऱ्या दिवशी चित्रपट, मालिका आणि नाटक या तीनही माध्यमात सहज वावरणाऱ्या *ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती स्मिता ओक* तसेच राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित, *पोलीस मन* या पुस्तकाचे संवेदनशील *लेखक श्री. अजीत देशमुख* यांच्या मुलाखती असतील. मराठीवर प्रेम करणाऱ्या रसिकांनी या संमेलनास उपस्थित राहून साहित्यिक मेजवानीचा लाभ घ्यावा असे आवाहन मराठी साहित्य रसिक मंडळ, चेंबूर व श्री.ना.ग.आचार्य व श्री. दा.कृ.मराठे महाविद्यालय, चेंबूर, मुंबई आदी संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा