भजन बुवा,आयोजक आणि रसिकांची १२ फेब्रुवारीला तातडीची बैठक.
सिंधुदुर्ग
महाराष्ट्राची ओळख आणि अंभग,गजरातुन संतांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे प्रभावी काम भजनी बुवांच्या सातत्याने केले.
काळ बदलला तसे भजनामध्ये परिवर्तन झाले. सांगितीक जुगलबंदी तुन पारंपारिक डबल बारी उदयास आली. रसिकांनी तिला उदंड प्रतिसाद दिला. अनेक बुवा याच पारंपारिक डबलबारीतुन अजरामर झाले. पण त्यानंतर ट्वेंटी ट्वेंटी डबल बारी सुरू झाली आणि दोन्ही बुवा एकत्र बसून सादरीकरण करून लागले. यातुन अनेकदा अरे तुरे ची भाषा आणि घमासान सुरू झाले. आमचे सुसंस्कृत बुवा काही टवाळखोर आयोजक आणि रसिकांच्या नादी लागले, आणि भजनाचा बेरंग कधी झाला हे कळलंच नाही. दर दोन तिन महिन्यात काही ना काही बेताल वक्तव्य,हमरा तुमरीची भाषा, त्यांत कमी कि काय म्हणून काही महिला बुवांची घसरणारी भाषा यातुन आज भजनाचे तीन तेरा वाजताना दिसतात.
अशी महाराष्ट्राची संस्कृती असणाऱ्या भजनाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी काही जाणिव पुर्वक प्रयत्न करण्यासाठी जेष्ठ भजनी बुवां भालचंद्र केळुसकर,बुवा प्रकाश पारकर, बुवा संतोष कानडे,बुवा गोपीनाथ लाड ,बुवा विजय उर्फ गुंडू सावंत ,बुवा रवि कदम आणि सगळेच भजनी बुवा, पखवाज वादक, तबला वादक, सर्व युटुबर्स आयोजक, आणि भजन प्रेमी ,भजन रसिक यां सर्वाची तातडीची बैठक दिनांक १२ फेब्रुवारी रोजी बुधवारी सकाळी १०:०० वाजता रवळनाथ मंदिर ओरोस या ठिकाणी आयोजित केली आहे. तरी आपण सर्वांनी या, सोबतच ज्यांना भजन संस्कृती बद्दल खरोखरच तळमळ आहे अशा सर्वच रसिकांनी बैठकीला उपस्थित राहुन भजन पंरपरेचे योग्य जतन करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या मिटींगला उपस्थित राहुन सहकार्य करावे.
असे आवाहन सर्व भजन बुवा रसिक प्रेक्षक आणि आयोजक यांनी केले आहे.