You are currently viewing बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाचे आयोजन

बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाचे आयोजन

बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी 

शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या मार्फत दि. 11,12 व 13 फेब्रुवारी 2025 या कालावधित बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव जिल्हा परिषद शाळा ओरोस मुख्यालय सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित केलेला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन समारंभ मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. गणपती कमळकर यांनी दिली.

             या महोत्सवास प्रमुख पाहुणे खासदार नारायण राणे, विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, विधानसभा सदस्य दिपक केसरकर, निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र) किशोर काळे, वित्त व लेखा अधिकारी राजश्री पाटील, ओरोस ग्रामपंचायत सरपंच आशा मुरमुरे, जिल्हा परिषद शाळा ओरोस मुख्यालयचे शाळा व्यवस्थापन समिती हार्दिक शिगले आदी उपस्थित राहणार आहेत.

क्रीडा स्पर्धा नियोजन 

मंगळवार दि. 11 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 ते 1 समूहनृत्य स्पर्धा (मोठा गट ), दुपारी 2 ते 5  समहनुत्य स्पर्धा (लहान गट) (स्थळ. जिल्हा परिषद शाळा ओरोस मुख्यालय, सिंधुदुर्गनगरी.)

बुधवार दि. 12 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9.15 ते 9.30 वाजता क्रीडा ज्योत प्रज्ज्वलन, सकाळी 9.30 वाजता सर्व मैदानी स्पर्धा (मोठा गट) (स्थळ. डॉन बॉस्को हायस्कूल ओरोस.) सकाळी 10 ते 12 वाजता  समूहगान स्पर्धा (मोठा गट), दुपारी 12.30 ते 2 वाजता समूहगान स्पर्धा (लहान गट ) (स्थळ. जिल्हा परिषद  शाळा ओरोस मुख्यालय सिंधुदुर्गनगरी.)

            गुरुवार दि. 13 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता सर्व मैदानी स्पर्धा (लहान गट), (स्थळ. डॉन बॉस्को हायस्कूल ओरोस), सकाळी 9.30 ते 11.30  वाजता ज्ञानी मी होणार (मोठा गट), दुपारी 11.45 ते 1.45 वाजता ज्ञानी मी होणार (लहान गट) (स्थळ. जिल्हा परिषद शाळा ओरोस मुख्यालय सिंधुदुर्गनगरी.)

प्रतिक्रिया व्यक्त करा