कवठणीत खुल्या ग्रुप डान्स स्पर्धेचे आयोजन
सातार्डा
कवठणी येथील काजरोबा देवाच्या जत्रोत्सवानिमित्त उद्योजक दत्ता कवठणकर व मित्रमंडळातर्फे ८ फेब्रुवारीला खुल्या ग्रुप डान्स स्पर्धा होणार आहे. काजरोबा रंगमंचावर रात्री १० वाजता स्पर्धेला सुरुवात होईल. प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे २५ हजार, १५ हजार, १० हजार रु. व उत्तेजनार्थ बक्षिसे व चषक देण्यात येणार आहेत. मयुर रेडकर (८२०८१९२१४८९) यांच्याशी संपर्क साधावा.