You are currently viewing वझरेत महावितरणच्या सबटेशनचे काम लवकर सुरू करण्याची मागणी

वझरेत महावितरणच्या सबटेशनचे काम लवकर सुरू करण्याची मागणी

वझरेत महावितरणच्या सबटेशनचे काम लवकर सुरू करण्याची मागणी

दोडामार्ग

दोडामार्ग शहर व तालुक्यात विजेची समस्या गंभीर बनत चालली आहे. त्यामुळे वझरे येथे मंजूर केलेल्या महावितरणचे सबटेशनचे काम लवकर सुरू करावे अशी मागणी कसई-दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी माजी शिक्षणमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे, दोडामार्ग तालुक्यातील वझरे या ठिकाणी मंजूर केलेल्या विद्युत महावितरणचे सबस्टेशनच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात यावी. दरवर्षी पावसाळ्यात तालुक्यातील विजेचा लंपडाव सुरू होतो व त्यानंतर सलग चार ते पाच दिवस वीजेचा पत्ताच नसतो. नेमकी कोणत्या ठिकाणी समस्या निर्माण झाली आहे तीही शोधून काढण्यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांसमोर अडचण निर्माण होते.

गेल्या चार ते पाच वर्षांपासून पावसाळ्यात विजेच्या समस्यांशी येथील जनतेला तोंड द्यावे लागले आहे. तुम्ही मंजूर केलेल्या सबस्टेशनमुळे जनतेला विजेच्या समस्येपासून दिलास मिळेल अशी आशा होती. मात्र महावितरण व प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अद्यापपर्यंत वझरे येथील सबस्टेशनच्या कामाला सुरुवात झालेली दिसत नाही आहे. त्यामुळे कामाला निधी देऊनही अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे तालुक्यातील जनतेला यावर्षीही अंधारात रहावे लागेल. मंजूर केलेले काम आपल्या आदेशाने तात्काळ सुरू करण्यात यावे व त्याचबरोबर त्या सबस्टेशनला इन्सुली, महालक्ष्मी आणि त्या परिसरातून एक हाय व्होल्टेज लाईन जोडायला भेटल्यास विजेच्या समस्येतून पूर्ण शहर वासियांची आणि जास्त करून व्यापाऱ्यांचे नुकसान होणार नाही. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्याअगोदर आम्हाला या विजेच्या समस्येपासुन दिलासा द्यावा, अशी मागणी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी माजी शिक्षण मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा