You are currently viewing तिलारीच्या हत्ती प्रश्नावर ८ दिवसात वनमंत्री यांच्यासोबत बैठक – आमदार दिपक केसरकर 

तिलारीच्या हत्ती प्रश्नावर ८ दिवसात वनमंत्री यांच्यासोबत बैठक – आमदार दिपक केसरकर

तिलारीच्या हत्ती प्रश्नावर ८ दिवसात वनमंत्री यांच्यासोबत बैठक – आमदार दिपक केसरकर

दोडामार्ग

तिलारीत खानापूरच्या धर्तीवर हत्ती पकड मोहीम राबवावी ही मागणी घेऊन तालुक्यातील सरपंच, उपसरपंच १० फेब्रुवारीपासून दोडामार्ग वनविभाग समोर साखळी उपोषण करणार आहेत. दोडामार्ग दौऱ्यावर असणारे आमदार दिपक केसरकर हे रानटी हत्ती प्रश्नावर व्यक्त झाले ते म्हणाले, येत्या आठ दिवसात आपण मुंबई येथे वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी विशेष बैठक घेणार आहे आणि याबाबतचे धोरण ठरणार आहे. या विधानाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असल्या तरी वनमंत्री कोणती भूमिका घेतात याकडे तिलारी खोऱ्यासह दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा