संविता आश्रमच्या मदतीसाठी “सिरीयल किलर” नाटकाचे प्रयोग…
कुडाळ
रस्त्यावरील निराधार बांधवांच्या पुनर्वसनसाठी कार्य करणाऱ्या जीवन आनंद संचलित संविता आश्रम, पणदूरच्या मदतीसाठी ‘सिरीयल किलर’ या नाटकाचा प्रयोग येत्या ७ आणि ८ फेब्रुवारीला सावंतवाडी आणि कुडाळ मध्ये होणार आहे. या नाटकाला उपस्थित राहून जीवन आनंद संस्थेसाठी मदतीचा हात द्यावा, असे आवाहन जीवन आनंद संस्थेचे अध्यक्ष संदीप परब, किसान चौरे आणि सिरीयल किलर नाटकाचे लेखक-दिग्दर्शक केदार देसाई यांनी केले आहे. कुडाळ येथे मराठा सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान कुडाळ मध्ये होणारा प्रयोग हा सिरीयल किलरचा २५ वा प्रयोग आहे, तसंच या नाटकात प्रमुख भूमिका करणारे भाऊ कदम हे ८ फेब्रुवारीला संविता आश्रमाला देखील भेट देणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
जीवन आनंद संचलित संविता आश्रम, पणदूर यांच्या कार्याविषयी संदीप परब यांनी माहिती दिली. स्त्यावरील निराधार बांधवांसाठी हि २०१३ पासून कार्यरत आहे. १८ जानेवारीला या आश्रमला १३ वर्षे पूर्ण होऊन १४ व्या वर्षात पदार्पण झालेले आहे. आश्रम हा पूर्णतः सिंधुदुर्गवासियांच्या आणि बाहेरच्या दानशूर व्यक्तींच्या मदतीवर सूर आहे. आता सध्या आश्रमामध्ये १७८ निराधार बांधव आहेत. त्याच्यामध्ये तीन महिन्याच्या बाळापासून ९८ वर्षाच्या आजीहा समावेश आहे. त्याच्यामध्ये ७० टक्के हे रस्त्याचे बांधव आहेत आणि काही एकाकी, मुलबाळ नसलेले, मनोरुग्ण असे आहेत.
या सेवेचा आर्थिक बोजा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. त्यामुळे निधी उभा करण्यासाठी आम्ही केदार देसाई लिखित दिग्दर्शित तसेच प्रणय तेली निर्मित भाऊ कदम यांची प्रमख भूमिका असलेले सिरीयल किलर या नाटकाचा प्रयोग आयोजित केलेला आहे. दिनांक ७ फेब्रुवारीला सायंकाळी ७ ३० वाजता बॅरिस्टर नाथ पै सभागृह सावंतवाडी येथे आणि ८ फेब्रुवारीला संध्याकाळी साडेसात वाजता कुडाळच्या बाबा वर्दम रंगमंच येथे हे नाटक होणार आहे. सावंतवाडीत राजश्री फोटो स्टुडिओ येथे तर कुडाळ मध्ये नेमळेकर स्नॅक्स कॉनर्र येहते या नाटकाची तिकीट विक्री सुरु झाली आहे. तिकीट घेतल्यावर रीतसर त्या रकमेची पावती देण्यात येईल. त्यामुळे आपण या नाटकाला उपस्थित राहावे असे आवाहन संदीप परब यांनी केले.
केदार देसाई म्हणाले, सिरीयल किलरचा कुडाळ मध्ये प्रयोग झाला त्यावेळी संदीप देसाई यांनी हे नाटक संविता आश्रमच्या मदतीसाठी करावा अशी इच्छा व्यक्त केली होती. त्या प्रमाणे एक चांगले कार्य करणाऱ्या संस्थेसाठी सिरीयल कलर हे नाटक करण्याचे आम्ही ठरविले. संदीप परब यांचे कार्य तर आपल्याला माहित आहे. आपण आपापल्या परीने कुडाळ मधील सिंधुदुर्गातील बरेच जण जमेल तशी मदत संस्थेला करता. त्यांचा जो काही पसारा आहे तो खूप मोठा आहे. त्याचा खर्चही खूप मोठा आहे.त्यासाठी या नाटकाला या. ह्या शोला तुम्ही येणार म्हणजे तुम्ही ह्या कार्याला एक मदत करत आहात, हातभार लावत आहात. या दृष्टीने मी सगळ्यांना विनंती करतो की सात आणि आठ फेब्रुवारीला जिथे जमेल तिथे येऊन सिरीयल किलर नाटक बघावे असे आवाहन केदार देसाई यांनी केले. तसेच कुडाळ मध्ये होणारा प्रयोग हा सिरीयल किलरचा २५ वा प्रयोग आहे, त्याच बॊर्बर या नाटकात प्रमुख भूमिका करणारे भाऊ कदम हे ८ फेब्रुवारीला संविता आश्रमाला देखील भेट देणार आहेत, असेही श्री. देसाई यांनी सांगितले.
यावेळी किसन चौरे यांनी देखील संस्थेच्या कार्याचा आढावा घेताना अनेक विखुरलेली कुटुंब या संस्थेने एकत्र आणली असे सांगितले. या पत्रकार परिषदेला जीवन आनंद संस्थेचे किसन चौरे, निर्माता प्रणय तेली, भूषण तेजम, ईशान देसाई, ऋषिकेश तेली उपस्थित होते. भूषण तेजम यांनी सर्वांचे आभार मानले.

