वैभववाडीत १५ फेब्रुवारीला राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय भव्य बैलगाडा शर्यत…
वैभववाडी
बंड्या मांजरेकर मित्र मंडळ नाधवडे आयोजित राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय भव्य बैलगाडा शर्यत स्पर्धेचे आयोजन १५ फेब्रुवारी महादेव मैदान नाधवडे (तरळे – वैभववाडी मार्ग) या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.
या शर्यतीचे उद्घाटन मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धेतील विजेत्या संघाला ३५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक २५ हजार रुपये, तृतीय क्रमांक १५ हजार रुपये, चतुर्थ क्रमांक १२ हजार रुपये, उत्तेजनार्थ क्रमांक १० हजार रुपये, तसेच जिल्हास्तरीय बैलगाडा स्पर्धा प्रथम क्रमांक २० हजार रुपये, द्वितीय क्रमांक १७ हजार रुपये, तृतीय क्रमांक १२ हजार रुपये, चतुर्थ क्रमांक ८ हजार रुपये, तसेच राज्यस्तरीय गावठी जोडी स्पर्धा प्रथम क्रमांक ७ हजार रुपये, द्वितीय क्रमांक ५ हजार रुपये, तृतीय क्रमांक ३ हजार रुपये, उत्तेजनांचा २ हजार ५०० रुपये पारितोषिक ठेवण्यात आले आहे.
याप्रसंगी भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपा महाराष्ट्र सचिव प्रमोद जठार, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुळशीदास रावराणे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, राज्य पणन महासंघ संचालक प्रमोद रावराणे, भाजपा वैभववाडी अध्यक्ष सुधीर नकाशे, उद्योजक हनुमंत नारकर, उद्योजक दिगंबर ईश्वलकर, माजी सभापती बाप्पी मांजरेकर, सरपंच लीना पांचाळ आदी उपस्थित राहणार आहेत. तरी या सोहळ्याला मोठ्या संख्येने बैलगाडा प्रेमी व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन माजी उपसभापती बंड्या मांजरेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी दया तानवडे 8788544594, राजू शिंदे 7977556825, यांच्याशी संपर्क साधावा.

