You are currently viewing पाणथळ जागेचे संवर्धन: पर्यावरण संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल- प्रा.डॉ. हेदुळकर

पाणथळ जागेचे संवर्धन: पर्यावरण संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल- प्रा.डॉ. हेदुळकर

*पाणथळ जागेचे संवर्धन: पर्यावरण संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल- प्रा.डॉ. हेदुळकर*

*वैभववाडी*

२ फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने
सामाजिक वनीकरण विभाग वैभववाडी आणि आनंदीबाई रावराणे महाविद्यालय याच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पाणथळ दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश जलस्रोतांचे संरक्षण व संवर्धन याबाबत जनजागृती करणे हा होता. पाणथळ भाग हे महत्त्वाचे परिसंस्था असून ते पाणी गाळण्याचे नैसर्गिक केंद्र, पूर नियंत्रण आणि अनेक प्रजातींसाठी निवासस्थान म्हणून कार्य करतात. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयातील एनसीसी, नेचर क्लब चे विद्यार्थी तसेच सामाजिक वनीकरण चे अधिकारी यांनी एकत्रित रित्या कोकिसरे- बांबरवाडी येथील ब्राह्मणतळ या स्थानिक पाणथळ परिसरातील प्लास्टिक कचरा गोळा करून स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. त्यानंतर प्रा.डॉ एन.आर. हेदुळकर यांनी पाणथळ क्षेत्रांचे जैवविविधतेसाठी असलेले महत्त्व, त्यांचे जलचक्रातील योगदान, प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण आणि त्याचे जैवविविधतेवरील परिणाम आणि पर्यावरणीय शाश्वततेसाठी त्यांचे संरक्षण आवश्यक का आहे यावर सखोल मार्गदर्शन केले. सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल श्री.प्रकाश पाटील, लेफ्टनंट प्रा.रमेश काशेट्टी यांनीही पाणथळ क्षेत्रांचे संरक्षण करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी, पाणथळ क्षेत्रांचे संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात येऊन भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.यावेळी महाविद्यालयातील एनसीसी विभागाचे विद्यार्थी, वैभव नेचर क्लब चे विद्यार्थी व सामाजिक वनीकरणचे कर्मचारी सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा