सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये सिस्टर स्टाफ व कर्मचाऱ्यां कडून हॉस्पिटल परिसराची स्वच्छता
सावंतवाडी
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये सिस्टर स्टाफ व कर्मचाऱ्यां कडून हॉस्पिटल परिसराची स्वच्छता करण्यात आली. जी आर प्रमाणे हा उपक्रम दर सोमवारी नऊ ते दहा या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे असे हॉस्पिटलचे अधीक्षक डॉक्टर गिरीश चौगुले यांनी सांगितले. या उपक्रमात हॉस्पिटल मधील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त भाग घेतला.
सदर स्वच्छता अभियानाचा हा दुसरा सोमवार आहे यापुढेही दर सोमवारी हॉस्पिटल परिसरात अशाच प्रकारे स्वच्छता मोहीम हाती घेतली जाणार आहे असेही डॉक्टर म्हणाले.
या उपक्रमामध्ये उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरही सहभागी झाले होते.