आर.पी.आय.(आठवले)पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षापदी-सौ.ज्योती जाधव यांच्या नियुक्तीचे अभिनंदन!
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षापदी दोडामार्ग च्या नगरसेविका-सौ.ज्योती रमाकांत जाधव यांची नुकतीच नियुक्ती झाल्याचे पत्र प्राप्त झाल्याने दोडामार्ग येथील स्नेह रेसिडेन्सी हॉटेल मध्ये बैठकीत सौ.जाधव यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन करण्यात आले.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री- नाम.रामदास आठवले यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या वतीने ही नियुक्ती केल्याचे पत्र महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस -ॲड.अभयाताई सोनावणे यांनी दिल्याने सौ.जाधव यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
बैठकीत पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव-रमाकांत जाधव,जिल्हा सरचिटणीस-प्रकाश कांबळे,जिल्हा कार्याध्यक्ष-सखाराम कदम,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा -सौ.ज्योती जाधव,तालूका उपाध्यक्ष-सत्यवान पालयेकर,तालूका सहसचिव-नकुळ कांबळे,सौ.जागृती सासोलकर,सौ.सरीता पिळगांवकर,सौ.प्रगती कांबळे,सौ.सेजल कांबळे,सिद्धार्थ कांबळे,सौ.स्नेहल पालयेकर,सौ.शशिकला कदम इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी संघटनात्मक विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.