*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सुमनांजली*
तुंम्हा पाहिले रस्त्यावरुनी दूर दूर जातांना
वाट तुमची पाहतो अजुनी दिसावे तुम्ही माघारी येतांना
का तुम्ही असे दूर जावे सोडून आम्हा माघारी
तुमच्या वाटेवरचा रस्ता सांगा ना वळतो का माघारी?
अजुनही तुमच्या प्रेमाचे आहोत आम्ही भुकेले
का दगा धोका देऊन असे तुम्ही सोडून गेले
कुठे शोधू तुम्हा आता हो आधाराच्या गावी
तो आधारवड असा का ढासळावा ज्याने साथ सोबत सोडावी
का तुम्ही असे दूर जावे दूर दूर गावाला
आठवणीत शोधून तुम्हाला का यावा पूर डोळ्याला
पुन्हा कधी ना भेट तुमची रस्त्यावर टक लावून पाहतो
नयनाश्रुंनी सु-मने सुमनांसह सुमनांजली वाहतो
कवी :-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
७५८८३१८५४३.
८२०८६६७४७७.