You are currently viewing संत तुकाराम जयंती

संत तुकाराम जयंती

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम अभंग रचना*

 

*संत तुकाराम जयंती* 

 

संत तुकाराम/ थोर भाग्यवंत

वारकरी पंथ/ त्याचा असे

 

वाणी व्यवसाय/ प्रपंचाच्या साठी

दुःखसदा पाठी /तुकयाच्या

 

वडिलांची माया /आई कणकाई

दुःख सारे साही /प्रपंच्यात

 

रखुमाई पत्नी/ दुसरी आवडी

सर्वांची नावडी /खाष्टअसे

 

कीर्तनी रंगती /भक्तजण सारे

अज्ञानाचे वारे /पळवीती

 

पंढरीची वारी/ नित्यनेम असे

मनी विठु वसे/ तुकयाच्या

 

दिंडयानि पताका/ मुखी विठुनाम

दिसे चारीधाम/ पंढरीत

 

तुकोबाची गाथा /काय वर्णु आता

टेकतसे माथा/ भक्तजण

 

आले न्यावयासी/ पुष्पक विमान

वैकुंठ गमन /सदेहसे

 

*शीला पाटील चांदवड*

प्रतिक्रिया व्यक्त करा