जिल्हा ग्रंथालयातील ग्रंथ मोबाईल ॲपव्दारे शोधा
सिंधुदुर्गनगरी
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाने ई-ग्रंथालय आज्ञावली स्वीकारली आहे.जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाने सभासदांकरीता मोबाईल ॲप सुरु केले असून सभासद मोबाईलमध्ये e-Granthalay ॲप डाऊनलोड करुन घेवून ग्रंथालयातील उपलब्ध ग्रंथ पाहू शकतात. या सुविधेमुळे सभासदाला ग्रंथ शोधणे सुलभ झाले आहे. तरी जास्तीत जास्त वाचकांनी ग्रंथालयाचे सभासद होण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांनी केली आहे.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग हे मुख्य प्रशासकीय इमारत, ‘ए ब्लॉक, तिसरा माळा, मॅझेनीन प्लॉथर, सिंधुदुर्गनगरी, सिंधुदुर्ग येथे कार्यरत आहे. या ग्रंथालयात आजरोजी ४३९४५ एवढी ग्रंथसंपदा असून १८ दैनिके व ३० मासिके नियमित येतात. आजच्या आधुनिक जगाप्रमाणे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, देखील आधुनिक झाले आहे.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाने पुर्वी ग्रंथ शोधणे, ग्रंथ देवघेव पारंपारिक पध्दतीने होत असे संभासदांचे सभासद कार्ड असे या कार्डवर सभासदांनी आणलेले ग्रंथ जमा केले जात व नवीन घेतलेल्या ग्रंथांची नोंद होत असे. ई- ग्रंथालय आज्ञावली स्वीकार केल्यानंतर ही प्रक्रीया ऑनलाईन झाली आहे. सभासदांची देवघेव ई-ग्रंथालय आज्ञावलीव्दारे करण्यात येते. यामुळे सभासदांकडे कोणता ग्रंथ आहे. तो कधी घेतला, परत कधी पर्यंत करावयाचा आहे. विशिष्ट कालावधीत किती देवघेव झाली हे समजण्यास मदत होते. तसेच आज्ञावलीव्दारे ग्रंथ शोधणे सहज व सोपे झाले आहे. यापुढे जाऊन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाने सभासदांकरीता e-Granthalay ॲपची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. हेॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.
सर्वप्रथम ॲप इंस्टॉल करावे.त्यांनतर आपला मोबाईल नंबर टाकावा. लॉगीन केल्यावर Select cluster मध्ये Maharashtra Government public Libraries हे ऑपशन निवडावे. Select Library मध्ये जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग निवडावे. Member Number ग्रंथालयातील आपला सभासद क्रमांक टाकावा. Verification code आपल्या मोबाईवर मॅसेजव्दारा आलेला व्हेरीफिकेशन कोड टाकावा. अशा प्रकारे आपल्या मोबाईलमध्ये e-Granthalay ॲप इंस्टॉल होईल. या ॲपमध्ये Search Catalog अथवा Search Symbhol व्दारे Books मध्ये जाऊन आपण आपला आवडता ग्रंथ अथवा आवडता लेखक यांचे नांव टाईप करुन सदर ग्रंथ ग्रंथालयात उपलब्ध आहे किंवा नाही हे पाहू शकता.
ग्रंथालयात नवीन सभासद होण्याकरीता प्रवेश शुल्क -10 रू, व्दीवार्षिक सभासद शुल्क-100 रु. (ना परतावा) व 500 रु. अनामत (परतावा) असे शुल्क आकारण्यात येते. तरी जास्तीत जास्त वाचकांनी ग्रंथालयाचे सभासद व्हावे, असे अवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांनी केले आहे.