पिंपरी न्यायालयात “मध्यस्ती जनजागृती कार्यक्रमाचे” यशस्वी आयोजन
पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशन व पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचा संयुक्त उपक्रम*
पिंपरी
पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने “मध्यस्ती जनजागृती कार्यक्रमाचे” आयोजन पिंपरी न्यायालय नेहरूनगर येथे करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी यांची पुण्यतिथी असल्याने राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांचे फुलांचे रोपटे देत स्वागत करून करण्यात आली. याप्रसंगी पिंपरी न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश श्री. एन. आर. गजभिये, न्यायाधीश श्री. एम. जी. मोरे, श्रीमती. एस.एस. चव्हाण, श्री. एन. एन. गवळी, श्रीमती. टी. एस. महाडिक, श्री. बी. डी. चोखट, श्री. व्ही. एस. गायकवाड, श्रीमती. पी. डी. पाटील, वकील मध्यस्थ ॲड. अतिष लांडगे आदी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ॲड. अतिश लांडगे, पिंपरी न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश मा. एन. आर. गजभिये साहेब व पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी ॲड. अतिष लांडगे म्हणाले की, बऱ्याच लोकांना मेडिएशन हा विषय माहीत नसतो त्यामुळे वर्षानुवर्ष वाद न्यायालयातच सुरू राहतात, वैवाहिक जीवनामध्ये किरकोळ कारणामुळे न्यायालयात गेलेल्या अनेक जोडप्यांना मेडिएशन द्वारे एकत्र आणल्याचे विविध उदाहरणाद्वारे लांडगे यांनी उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिले. मेडिएशनची संपूर्ण प्रक्रिया गोपनीय ठेवण्यात येते.तसेच कौटुंबिक केसेस मधे मीडिएशन ला कोणत्याही प्रकारची फी लागत नाही. मिडियेटर समोर झालेल्या तडजोडीला कोणताही न्यायालयात आव्हान देता येत नाही यातून पक्षकाराचा पैसा व वेळ यांची बचत होते. न्यायाधीश श्री. गजभिये साहेब म्हणाले की, मेडिएशन म्हणजे दोन्ही पक्षकारांमध्ये मध्यस्थी करून योग्य तो मार्ग काढणे अनेक वेळा आम्ही न्यायनिर्णय देत असताना तो निकाल कोणीतरी एकाच्या बाजूने किंवा विरोधात तो निर्णय दिला जातो परंतु, मध्यस्थी यशस्वी झाल्यानंतर यातून दोन्ही पक्षकारांच्या हिताचा निर्णय होऊ शकतो आणि याचे समाधान आमच्या मनाला जास्त असते.
बारचे अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज यांनी वकील व पक्षकांरानी मेडिएशन प्रक्रियेचा अधिकाधिक उपयोग करून प्रलंबित दावे लवकर निकाली काढण्याचा पर्याय अवलंबवा असे आवाहन त्यांनी उपस्थित असणाऱ्या वकील व नागरिकांना केले. ॲड. लांडगे यांनी चांगल्या प्रकारे मीडिएशन द्वारे केसेस सोडविल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा.श्री भूषण गवई साहेबांच्या सहीचे प्रशस्तीपत्र त्यांना देण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाचे नियोजन पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा च्या सचिव श्रीमती सोनल पाटील यांच्या निर्देशानुसार घेण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या शेवटी संपूर्ण जगाला सत्य, अहिंसा आणि शांतीचा मार्ग दाखवणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त उपस्थित सर्व न्यायाधीश, वकील व नागरिक यांना पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे सचिव ॲड. उमेश खंदारे यांच्यामार्फत शांती, अहिंसा आणि सामाजिक सदभावनेची शपथ देण्यात आली.
यावेळी पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे मा. उपाध्यक्ष ॲड. दत्ता झुळुक, मा. सचिव ॲड. धनंजय कोकणे, ॲड. महेश टेमगिरे, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. संगीता परब, ॲड. प्रसन्न लोखंडे, ॲड. सनी काटे, ॲड. सौरभ काटे, ॲड. धनराज पवार, ॲड. अनिल शेजवाणी, ॲड. धीरज कुचेरीया, ॲड. गणेश राऊत, ॲड. मिताली वाखारे, ॲड. भोंडे व इतर वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज, सचिव ॲड. उमेश खंदारे, महिला सचिव ॲड. रिना मगदुम, खजिनदार ॲड. अक्षय फुगे, सदस्य ॲड. संकेत सरोदे, सदस्य ॲड. विकास शर्मा, ॲड. राजेश राजपुरोहित, ॲड. संघर्ष सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव ॲड. उमेश खंदारे यांनी केले. ॲड. अक्षय फुगे यांनी आभार मानले.
_____________________________
*संवाद मीडिया*
*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.)
*वारस होऊ सैनिकी परंपरेचे…*
काळानुरूप जलदगतीने बदलत जाणाऱ्या शैक्षणिक गरजा, विज्ञान व माहिती तंत्रज्ञानाच्या
युगात, वाढत्या स्पर्धात्मक जीवनात जिद्दीने आणि महत्वाकांक्षी वृत्तीने यशस्वी होणारे विद्यार्थी
निर्माण करण्याचे पवित्र आणि प्रामाणिक ध्येयरूपी कार्य सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट एक्स सर्व्हिसमेन
असोसिएशन संचलित शासनमान्य सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली गेली 21 वर्षे अविरतपणे करित आहे.
*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.)
*🏆An Award Winning School🏆*
महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..
Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
💁♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
👉शैक्षणिक वर्ष 2025 – 26 करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ६ वी च्या वर्गासाठी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु
*✨आमची वैशिष्ट्ये✨*
➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division
📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
https://forms.gle/vPE7oVGpsLmEUMw68
*www.sindhudurgsainikschool.com*
वरील लिंकवर ऑनलाईन नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.
*💁♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*
*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*जाहिरात
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*