*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम लेख*
*टाकू मागे व्यर्थ भीती*
अगदी बालपणापासून भीतीचं हे भूत आपल्यामागे असते. चढूनको,उतरू नको,पडशील,लागेल.. पावसात भिजशील, पाय घसरेल..
..एक ना अनेक धास्ती आपल्या मनात असतात.अर्थातमोठे कधी काळजीपूर्वक बोलतात,कारण काही मुलेही फारच बिनधास्त असतात,पण जी मुळात मनाने कणखर नसतात ते लवकरच भितात…व इथूनच समोरील आयुष्यात प्रगतीतला अडसर तयार होतो.
एकटं जाणं येणं,शाळा ,परिक्षेची भीती,गाडी बस मिळेल का,प्रवासात अडथळे येतीलका…सामान नीट राहील की नाही,अशा सगळ्या छोट्या मोठ्या काळज्या, भीतीचं रूप घेतात.नोकरी, इंटरव्ह्यू,ते विवाहापर्यंत व नंतर घर,मुले,सांसारिक काळजी आपली पाठ सोडत नाही.
हे सगळं समजून घ्यायला सकारात्मक वृत्ती मुलांमधे वाढवायला हवी.जमेल, प्रयत्न करू,यश नक्की मिळेल..ही मानसिकता वाढवायला हवी,
स्वत:चीही.
त्यासाठी भिडस्त पणा सोडून मनमोकळे बोलायला हवे.एकमेकांशी बोलून शंका निरसन रायला हवे.माहिती घ्यायला हवी.स्वभाव प्रत्येकाचा वेगळा असणारच हे समजून वागणं बोलणं असावं.आपल्याला योग्य माहिती मिळाली की आठवणीने लगेच कृतज्ञता व्यक्त करावी…
आपली कार्यक्षमता अफाट असते.केवळ भिऊन आपण मागे रहाता कामा नये.निसर्ग ,प्राणी पशुपक्षीही आपल्याला चिकाटीने जीवन जगायला शिकवतात.
तेव्हा
हार न मानता भितीच्या ब्रम्ह राक्षसाला परतवून लावावे..व आपल्या ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न करून व सकारात्मक राहून उद्दिष्ट नक्कीच
गाठता येते….!!
०००००००००००००००
अरुणा दुद्दलवार
दिग्रस यवतमाळ @✍️