*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*शब्दच माझे…भांबावले..!*
शब्दश: सांगायचं झालतरं..माझा
सातबाराचं शब्दांनी मांडला
जमीनीवरच्या तिरक्या रेघोट्यांनी
सातबाराचं कोरा केला..
जमवता जमवता सारं
आयुष्य निघून गेलं
उजळ माथ्यानं फिरणं
शब्दांनीच माझ्या गमावलं..!
ओतप्रोत भरलेलं अधःपतन
वेदनाग्रस्त शब्दांनी पाहिले
अतिउत्साह मलाचं नडला
शब्दचं ..माझे भांबावले..!
सन्मानाने जगण्याचा अधिकार
शब्दांनीच मला दिला
आगीतून फुफाट्यात जातांना
अतिआत्मविश्वास अंगात भिनला..!
अभावतही संजीवक हावभाव
शब्दांनीच माझ्या स्विकारले
भिंतीवरच्या आरश्यापुढे माझेचं
प्रतिबिंब नव्याने… उभे केले..!
नूतन ओढींच्या मोहास
शब्द..आजही भांबावलेले.!!
बाबा ठाकूर

