ओरोस :
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून ३ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आलेला लोकशाही दिन दुपारी ११ ऐवजी ३ वाजता होणार आहे. यासाठी पालकमंत्री नितेश राणे उपस्थित राहणार आहेत. यावेळी जिल्ह्यातील सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी जाणून घेऊन त्यावर निरसन करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हातील नागरिकांनी याची माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.