शिक्षक भारतीची पोलिसांकडे मागणी
तळेरे
शाळेत अनाधिकृत प्रवेश करीत जांभवडे ज्यु.
काॅलेजच्या एका शिक्षकाला मारहाण करणाऱ्या’त्या’ माथेफिरू यूवकावर त्वरीत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी लेखी मागणी शिक्षक भारती सिंधुदुर्ग संघटनेने कुडाळ पोलिस ठाण्यात केली आहे.
दि.१९ रोजी जांभवडे ज्यु.काॅलेजच्या एक सहा. शिक्षक कोवीड काळातील सुचनाबाबत विद्यार्थ्यांना माहिती सांगत असताना त्या काॅलेजमधील एका विद्यार्थ्याच्या भावाने(रोहित चंद्रकांत मडव) याने शाळेत अनाधिकृत प्रवेश करीत शिक्षकाला मारहाण केली.
सध्या शासनाच्या आदेशानुसार व नियमांचे काटेकोरपणे पालन करुन सर्व शाळा ,कॉलेज सुरू आहे. तरीही
शैक्षणिक संकुलात अनाधिकृत प्रवेश करून शिक्षकांवर हात उचलणे हा गंभीर गुन्हा असून,असे समाज विघातक कृती केल्याबद्दल व शिक्षकांची चुक नसतानाही त्यांना झालेली मारहाण या प्रकाराचा शिक्षक भारती सिंधुदुर्ग जाहिर निषेध करीत आहे.
शासन नियमानुसार कोविडच्या आपत्ती काळात विद्यार्थी व शिक्षकाव्यतिरिक्त इतर कोणत्याही पालकांना शाळेत प्रवेशबंदी असताना असे शाळेत अनाधिकृत प्रवेश करीत आॅनड्युटी असलेल्या शिक्षकाला मारहाण करणे निषेधार्ह आहे.
सदर व्यक्तीवर त्वरीत गुन्हा दाखल करून शिक्षकाला न्याय द्याव अशी लेखी मागणी शिक्षक भारतीने कुडाळ पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.