ओला सुका हा कचरा विलगीकरण करू या!
महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त पथनाट्य..
पिंपळे गुरव –
दिलासा संस्था आणि मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थांच्या वतीने महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त राजमाता जिजाऊ उद्यान पिंपळे गुरव येथे स्वच्छतेचे महत्व आणि महात्मा गांधी यांचे विचार पथनाट्यातून जनजागृती म्हणून सादर करण्यात आले.
ओला सुका हा कचरा, विलगीकरणं करू या! पिंपरी चिंचवडला नंबर वन करू या! असे म्हणत पथनाट्याला सुरुवात झाली…
पथनाट्यामध्ये मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आण्णा जोगदंड,दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक,प्रकाश घोरपडे, संगीता जोगदंड,सुभाष चव्हाण, मुरलीधर दळवी, शामराव सरकाळे आणि महात्मा गांधी यांच्या वेशभूषेत डॉ. पी. एस. आगरवाल यांनी सहभाग घेतला होता.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कचऱ्याच्या गाडीसमोर हे पथनाट्य सादर करण्यात आले.
ओला आणि सुका कचरा विलगीकरण करून वेगवेगळ्या डब्यातून भरलेला असावा आणि रोज सकाळी येणाऱ्या महापालिकेच्या गाडीत वेगवेगळ्या कप्प्यात तो टाकला जावा. स्वच्छ्तेत ईश्वर दडलेला असतो हे प्रबोधन करण्यात आले.
पथनाट्यात सहभागी अण्णा जोगदंड म्हणाले.. ” काचा, ब्लेड, धारदार वस्तू या कचऱ्यात टाकू नयेत. तर ते स्वतंत्र घंटागाडीतील सेवकांच्या हातात द्यावे. त्याच कचऱ्याच्या गाडीवर एक महिला सफाई कामगार बसलेली असते याचा विचार करावा.
महात्मा गांधी झालेले डॉक्टर पी एस आगरवाल म्हणाले..
” शरीराच्या स्वच्छतेबरोबर माणसाच्या मनाची स्वच्छता आजच्या काळात होणे आधिक गरजेचे आहे. देशाची लोकसंख्या वाढत आहे. शहरे वेगाने वाढत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता पाळणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे. भारतीय लोकशाहीने जसे आपणास मूलभूत हक्क दिले आहेत तसेच राष्ट्रनिष्ठा म्हणून प्रत्येक नागरिकांनी कर्तव्याचे पालन करणे क्रमप्राप्त आहे.
दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक म्हणाले.. ” आपले अंगण स्वच्छ झाले म्हणजे सगळे काम पूर्ण होत नाही. आपल्या घराच्या दोन्ही बाजूकडील अंगणे जेव्हा स्वच्छ होतील तेव्हाच आपल्या घराचे अंगण खऱ्या अर्थी स्वच्छ राहू शकते.
शामराव सरकाळे आणि मुरलीधर दळवी यांनी गावाकडील भाषा वापरून पथनाट्यात प्रभावी भूमिका केली. प्रकाश घोरपडे यांनी महानगरपालिकेचे अधिकारी ही भूमिका वठवली.
पिंपरी चिंचवड शहराचे उपायुक्त सचिन पवार म्हणाले कि घातक कचरा, सुका, ओला कचरा वेगळा करून पालिकेला सहकार्य करावे काही नागरी समस्या असतील तर जरूर सांगावे.”आम्ही सर्वजन मदत करण्यास तयार आहोत.
यावेळी सहाय्यक आयुक्त मा. सचिन पवार, मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे अध्यक्ष अण्णा जोगदंड दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक, गुणवंत कामगार संगीता जोगदंड, मराठवाडा जन विकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार ,ड प्रभागाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी शांताराम माने, आरोग्य निरीक्षक स्नेहल कांबळे ,आरोग्य निरीक्षक रश्मी तुंडलवार,आरोग्य निरीक्षक शंकर घाटे ,मुरलीधर दळवी, डॉ. पी.एस.अगरवाल ,सुभाष चव्हाण ,शामराव सरकाळे ,प्रकाश घोरपडे,प्रकाश बंडेवार ,मुकादम विनोद कांबळे ,दीपा गराडे, सुमन कारखानीस, सा.का.प्रदीप गायकवाड, उदय ववले, गुणवंत कामगार शंकर नाणेकर,काळूराम लांडगे ,ज्ञानराज वाडेकर ,जयश्री गुमास्ते, श्रीकृष्ण फिरके, बेसिक्स टीमचे समाधान कांबळे,सागर पाटील,शुभम बेंद्रे ,झोनल इन्चार्ज सुखदेव लोखंडे, वार्ड इन्चार्ज विजय पेंडे ईत्यादी उपस्थित होते.
घंटा गाडीवर काम करणाऱ्या महिला कर्मचारी गंगुबाई अलजेंडे यांचा सन्मान शाल, श्रीफळ देऊन महात्मा गांधींच्या भुमिकेत असलेले डॉ. आगरवाल यांच्या हस्ते करण्यात आला.आभार बेसिक्स टीमचे सुखदेव लोखंडे यांनी मानले
महात्मा गांधी यांना समर्पित आदरांजली आणि राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.
वृत्तांकन – आण्णा जोगदंड
मो. ९८८१२०९११९
९३५९ २०१२९५
.______________________________
*संवाद मिडिया*
*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2025-26)
*MHT- CET 2025* *क्रॅश कोर्स*
12 वी science च्या विद्यार्थ्यांसाठी.
Sub..*PCM / PCB*
बॅच सुरू..*1 मार्च 2025 पासून.*
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
बॅच सुरू.. *1 एप्रिल 2025 पासून.*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30* ( अभ्यंकर कुलकर्णी ज्यू. कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी)
*दुपारी 1.30 ते 4.30* ( शिर्के, पटवर्धन, फाटक आणि नवनिर्माण कॉलेज च्या विद्यार्थांसाठी )
========================
*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, Maths English*
बॅच सुरू.. *1 एप्रिल 2025 पासून*
Btach timing
*सकाळी 9 वाजता* ( अभ्यंकर कुलकर्णी ज्यू कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी)
*दुपारी 1.30 वाजता* ( शिर्के, पटवर्धन आणि फाटक कॉलेज च्या विद्यार्थ्यांसाठी )
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *15 एप्रिल 2025 पासून*
========================
🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
(16 वर्ष यशस्वीतेची )
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
8208702704
ऑफिस 9422896719
*Advt/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*