*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*किती सोसले उन्हाळे*
आठवत नाही आता
किती सोसले उन्हाळे
खळाळत्या पुरापुढे
नित्य झुकले लव्हाळे…..
पायी सोसले चटके
चालताना अनवाणी
संसाराच्या परडीत
फुलं वेचली देखणी……
काटे टोचून घेतले
फुले त्यांना मुलायम
सल माझ्या सोबतीला
गंधकुपी घमघम….
आला पाऊस पहिला
ग्रीष्म सरून वसंत
गाते आनंदाचे गाणे
झळा झेलून अनंत….
कसा सोसला उन्हाळा
नको आता गहिवर
झाले आयुष्य हिरवे
पावसाची येता सर….!!
~~~~÷÷÷÷÷÷~~~~
*अरुणा दुद्दलवार@✍️*