You are currently viewing ग्राहक पंचायत संस्थेच्या दिनदर्शिकेचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विमोचन

ग्राहक पंचायत संस्थेच्या दिनदर्शिकेचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विमोचन

*ग्राहक पंचायत संस्थेच्या दिनदर्शिकेचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विमोचन*

वैभववाडी

ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या दिनदर्शिका- २०२५ चे विमोचन सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्री.अनिल पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
मंगळवार दिनांक २८ जानेवारी रोजी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची मासिक सभा अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्री.अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी परिषदेच्या सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीम.आरती देसाई, ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्य सहसचिव, जिल्हाध्यक्ष व अशासकीय सदस्य प्रा.एस.एन.पाटील, जिल्हा उपाध्यक्ष व अशासकीय सदस्य श्री.सीताराम कुडतरकर, जिल्हा संघटक व अशासकीय सदस्य विष्णुप्रसाद दळवी, वैभववाडी तालुका अध्यक्ष व अशासकीय सदस्य श्री.तेजस साळुंखे, परिषदेचे शासकीय सदस्य प्रतिनिधी, विविध प्रवर्गातील अशासकीय सदस्य व पुरवठा विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते, थोर स्वातंत्र्यसेनानी, ग्राहक संरक्षण कायद्याचे जनक ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांच्या तत्वज्ञानावर कार्य करणाऱ्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्यावतीने प्रसिद्ध केलेल्या दिनदर्शिका-२०२५ चे विमोचन सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्री.अनिल पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी त्यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे अभिनंदन करुन कार्याला शुभेच्छा व्यक्त केल्या. उपस्थित शासकीय व अशासकीय सदस्य यांना दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा