You are currently viewing क्षयरुग्ण शोध मोहीम

क्षयरुग्ण शोध मोहीम

क्षयरुग्ण शोध मोहीम

सिंधुदुर्गनगरी  

समाजातील सर्वाचे एकत्रित  प्रयन्त व सहयोगाने भारतातुन क्षयरोग दुरीकरण ध्येय पुर्ती करण्यासाठी  राष्ट्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्याव्दारे 100 दिवस सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिम (100 Day TB Campaign) 7 डिसेंबर 2024 पासून सुरु करण्यात आलेला आहे. ही मोहिमेचा मुख्य उद्देश क्षयरोगाचे जास्तीत जास्त रुग्ण शोधुन क्षयरोग मृत्यु दरात घट करणे हा आहे. ही मोहिम 24 मार्च 2025 ‘जागतिक क्षयरोग दिन’ रोजी संपणार आहे.

या मोहिमेचा उ‌द्देश हा जास्तीत जास्त क्षयरुग्ण शोधून त्यांना उपचारावर आणणे, क्षय रुण्याचा मृत्युदर कमी करणे, नवीन क्षयरुग्णांचे प्रमाण कमी करणे, वंचित व अतिजोखमीच्या घटकापर्यंत पोहोचून आरोग्य सेवा पुरवणे, क्षयरोगाविषयी जनजागृती करणे, समाजातील क्षयरोग विषयी असलेले गैरसमज दूर करणे व सामाजिक कलंक कमी करणे, जिल्ह्यातील क्षय रुग्णांना “पंतप्रधान क्षयमुक्त भारत” अभियानांतर्गत निक्षयमित्र यांच्याकडून पोषण आहार किटचे  वाटप करणे असा आहे.

100 दिवसीय क्षयरोग मोहीम देशभरातील 347 जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत असून यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे. या मोहिमेत जोखीमग्रस्त भाग निवडून त्यांचे सर्वेक्षण कारणे, निक्षय शिबीर घेण्यात येत आहे. अनाथाश्रम, वृध्दाश्रम, उद्योग संस्था, निवासी शाळा, कारागृह येथे क्षयरोग तपासणी शिबीर तसेच स्थलांतरित, ऊसतोडणी कामगार, उच्च जोखीमग्रस्त भाग  व वंचित घटक यांचे सर्वेक्षण करण्यात येणार येत आहे. त्यातील संशयित व्यक्तीची थुंकी तपासणीचरोबर क्ष-किरण तपासणी करण्यात येत आहे. यासाठी जिल्हास्तर व तालुकास्तरावर नियोजन केले आहे.

आजअखेर 100 Day Campaign अभियानातील आरोग्य शिक्षण व जनजागृती करिता समाजातील सर्व स्तरावर 249 उपकेंद्राच्या माध्यमातुन जिल्ह्यातील एकुण 744 गावामधुन क्षयरोग जनजागृती करीता दृक श्राव्य व इतर भौगालिक परिस्थिती नुसार आजाराविषयी माहीती देण्यात आली आहे. या मध्ये निक्शय शिबीरे, ग्रामसभा, तपासणी शिबीरे,मधुन तसेच पोस्टर, हॅन्डवील वाटप, वॉल पेन्टीग, रांगोळी स्पर्धा, प्रभात फेऱ्या, शाळा कॉलेज भेटी देवुन माहीती देवुन, निक्शय शपथव्दारे या आजाराविषयी जनजागृती करण्यात येत आहे.

क्षयरोगाची लक्षणे क्षयरोग चे अतिजोखामिचे गट
दोन आठवड्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला , रात्री घाम, दोन आठवड्यापेक्षा जास्त कालावधीचा ताप, थुंकीतून रक्त पडणे, छातीत दुखणे, श्वसनास त्रास होणे, वजनात घट, भुक मंदावणे, थकवा,अशक्तपणा जाणवणे, मानेवर किंवा शरीरावर इतर ठिकाणी गाठी येणे 60 वर्षा वरीला व्यक्ती, मधुमेह, बरे झालेले क्षयरुग्ण, क्षयरुग्णाचे सहवासित, कमी वजनाच्या व्यक्ती,धुम्रपान करणारे, दारु पिणारे.

अतिजोखमीच्या गटातील सर्व लाभार्थ्यांची व लक्षणे असलेल्या रुग्णाचे X Ray Test, NAAT, microscopy (Sputum Test) क्षयरोग विषयक तपासण्या करण्यात येतात. तपासणी अंती रुग्ण दुपित आढळल्यास रुग्णांस क्षयरोग उपचारात्मक औषधोपचार देण्यात येतो व देण्यात येणाऱ्या औषधोपचार बावत क्षयरोग यंत्रणेमार्फत पाठपुरावा करण्यात येतो

आज अखेर 100 Day Tb Campaign अभियानातील अतिजोखमीच्या (Vulnerable Population) गटातील एकुण 177516 पैकी 105396 एवढ्या लाभार्थ्यांची क्षयरोग विषयक तपासणी (TB Screening) करण्यात आलेली असुन त्यामधुन एक्स रे तपासणी- 8183 NAAT testing 2110 तसेच 2233 एवढ्या लाभार्थ्यांची Sputam Microscopy करण्यात आलेली आहे त्यापैकी 95 एवढे रुग्ण क्षयरोग बाधित आढळून आलेले आहेत. क्षयरोग मुक्तीसाठी सर्वाचा सहभाग महत्वाचा असुन जनभागीदारी व्दारेच ही मोहिम आपण सहस्वी करु शकतो तरी सर्वानी या मोहीमेत सहभागी होवुन ही मोहीम आपण मनस्वी करूया असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षल जाधव यांनी केले.

 वरील लक्षणे असणाऱ्या व अतिजोखमीच्या व्यक्तीनी या शासनाच्या क्षयरोग दुरीकरणा साठी निर्धारीत केलेल्या या 100 दिवसीय अभियान कालावधीत जवळच्या शासकिय रुग्णालयात जावुन क्षयरोग विषयक तपासणी अंतर्गत एक्स रे, नॅट टेस्टींग (धुंकी तपासणी) करून घ्यावे व क्षयरोग मुक्त भारत या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा