You are currently viewing वेदना

वेदना

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*वेदना*

 

वेदना स्त्रीच्या मनाची

कुणा कशी ना उमजतं

तिच्या मनाची तळमळ

कशी कुणा ना कळतं

 

क्षणातच मन तिचं

मुला बाळात रमतं

येता दिवाळीचा सण

वाट भावाची पाहतं

 

स्त्रीच्या मनाची वेदना

दोन्ही कुळांना जपतं

येता आईची आठवं

कसं माहेरी पळतं.

 

दीर्घ आयुष्य मागते

काळजाच्या तुकड्याला

करी उंबराची पुजा

आयु हळदी कुंकवाला

 

तिच्या विना सारं घरं

कसं लागे सुनं सुनं

तिचं घरात असणं

जणु प्रेमाचं चांदणं

 

तिन्ही सांजेला लावते

देवापाशी सांजवात

घरादाराला मागते

विठुराया तुझी साथ

 

सदा सुखी तेचि घरं

तिथं आईचं असणं

वाणी असेल पवित्र

होता आईचं दर्शन

 

*शीला पाटील. चांदवड.*

प्रतिक्रिया व्यक्त करा