सिंधुरत्न समृध्द योजनेअंतर्गत व्यावसायिक हळद शेती मार्गदर्शन व प्रशिक्षण 5 फेब्रु. रोजी
दोडामार्ग
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली
ता. दापोली, जि. रत्नागिरी अंतर्गत सिंधुरत्न समृध्द योजनेअंतर्गत व्यावसायिक हळद शेती मार्गदर्शन व प्रशिक्षण दि.०५/०२/२०२५ रोजी दु. २ ते ५ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आले आहे.
* महत्वाचे मुद्दे
१) व्यावसायिक हळद लागवड तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन २) माहे जून २०२५ वर्षात हळद लागवडीकरिता नाव नोंदणी, (आधार कार्ड व ७/१२)
३) हळद उकळणी यंत्राचे प्रात्यक्षिक
४) सिंधुरत्न समृध्द योजनेअंतर्गत हळद लागवडीची माहिती व मार्गदर्शन मिळणार आहे.
या कार्यक्रमास मा.दिपक केसरकर, अध्यक्ष, सिंधुरत्न समृध्द योजना, आमदार (सावंतवाडी, दोडामार्ग), डॉ. संजय भावे, कुलगुरू महोदय,डॉ. बा.सा.को. कृ. वि. दापोली, डॉ. ममता कृष्णा धनकुटे, सहाय्यक संचालक
मसाले मंडळ, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय
भारत सरकार, प्रादेशिक कार्यालय, नवी मुंबई, महाराष्ट्र,
श्री. विक्रम मेहता, संचालक इसांते ऍग्री प्रा. लि. यांची उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमाची आयोजन महालक्ष्मी पॅलेस, पंचायत समिती कार्यालयाच्या वर, दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग करण्यात आले आहे.