You are currently viewing नागरिकांच्या दणक्यानंतर ग्रीड असलेले धोकादायक रस्ते अखेर साफ…

नागरिकांच्या दणक्यानंतर ग्रीड असलेले धोकादायक रस्ते अखेर साफ…

नागरिकांच्या दणक्यानंतर ग्रीड असलेले धोकादायक रस्ते अखेर साफ…

ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्याची मागणी; अनेक अपघात झाल्याचा आरोप…

सावंतवाडी

खडीयुक्त रस्ते ठेवणाऱ्या ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्याचा मागणी आक्रमक नागरीकांनी केल्यानंतर ग्रीड असलेले शहरातील रस्त्यांची पालिका प्रशासनाकडून तात्काळ साफ सफाई करण्यात आली. ग्रीड मारल्यामुळे शहरातील रस्ते अतिशय धोकादाय झाले होते. परिणामी अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी संतप्त नागरिक व जखमींच्या नातेवाईकांनी घेतल्यानंतर पालिकेकडून तात्काळ शहरात ग्रीड उचलण्यासाठी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

काही दिवस शहरात अपघाताचे प्रमाण वाढले आहे त्या ठिकाणी शहरातील अंतर्गत रस्ते करताना संबंधित ठेकेदाराने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ग्रीड टाकल्यामुळे त्या ठिकाणी गाड्या घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात अनेक जण जायबंदी झाले आहेत. मिळालेल्या माहितीत तब्बल नऊ जण अपघातात जखमी झाले आहेत. आज दुपारी पुन्हा एकदा अपघात झाला. यात रुग्णालयाची परिचारिका जखमी झाली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर काही जखमींच्या नातेवाईक व नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांची भेट घेतली

यावेळी रक्तदान संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, अपघातात जखमी झालेले उद्योजक सिद्धांत परब, प्रथमेश प्रभू, संदीप निवळे आदी उपस्थित होते. यावेळी संबंधित ठेकेदारावर तसेच पालिका प्रशासनावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी केली. त्यानंतर पोलिस निरीक्षकांनी आपल्याला एक दिवशीचा कालावधी द्या आपण सर्वांना सूचना करतो, असे सांगितले. त्यानंतर रस्त्यावर असलेली ग्रीड बाजूला करण्यास यावी, अशी त्यांनी पालिका प्रशासनाला सूचना केली. त्यानुसार हे काम तात्काळ सुरू करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा