*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*तू दिसते किती सुंदरं…*
नाकात नथ ही हातात बिलवर
अगं बाई बाई बाई तू …
दिसते किती सुंदरं…
माथ्यावर बिंदी नि कपाळी चंद्र
भुवयांची कमान पाहिल इंद्र
हिरव्या शालूला जरीचा काठ
शोभे किती पदर…
अगं बाई बाई…
रंगली मेंदी हातात लाल
हसती डोळे नि गुलाबी गाल
बोटात मुंदी नि कानात डुल
गोठपाटल्या चुडा बिल्वर…
अगं बाई बाई…
कुण्या ग राजाची राणी तू अशी
सजून धजून हिरकणी जशी
आरशात स्वत:ला बघते कशी
बघता तुला ग पडतील फशी
ओढून घेशी पदर…
अगं बाई बाई बाई तू…
दिसते किती सुंदर …..
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)