*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कविवर्य वैद्य.भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*
*पाळणा संस्कृतीचा*
पहिली माझी ओवी गं
स्रष्टा पालक ध्वंसीला
ब्रह्मा विष्णू पिनाकीला
जो जो बाळा जो जो रे ।।१।।
दुसरी माझी ओवी गं
चार वेद वेदांगांना
उपनिषदा षड्दर्शनांना
जो जो बाळा जो जो रे ।।२।।
तिसरी माझी ओवी गं
रामा रामायणाला
कृष्ण महाभारताला
जो जो बाळा जो जो रे ।।३।।
चवथी माझी ओवी गं
उपवेदा कवी ऋषिंना
संत पंत अन् तन्तांना
जो जो बाळा जो जो रे ।।४।।
पाचवी माझी ओवी गं
देवदानव सुरासुरा
भूत आणखी चराचरा
जो जो बाळा जो जो रे ।।५।।
सहावी माझी ओवी गं
मनुस्मृती अन् शास्त्रांना
गीताज्ञानाविज्ञाना
जो जो बाळा जो जो रे ।।६।।
सातवी माझी ओवी गं
दशावतारी देवांना
भारतमाता वीरांना
जो जो बाळा जो जो रे ।।७।।
आठवी माझी ओवी गं
नमस्कार हा शेतकर्या
आईबाबा गुरुवर्या
जो जो बाळा जो जो रे ।।८।।
स्रष्टा=निर्माता , ध्वंसी=संहारक वा विनाशकर्ता
*©सर्वस्पर्शी*
©कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख
नासिक ९८२३२१९५५०