*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मला सोडून जाऊ नकोस!*
तुझी माझी मैत्री घट्ट झाली
हात सुटायची फार भीती वाटते
तू दवबिंदूत भिजलास की!हल्ली कुणास ठाऊक !माझी दृष्टी जाते
तांबूल केशरकस्तुरी रूप तुझे
सुगंधीत अधीर कांता तुझी
रेशमीदुकूल मनोहर रूप तुझे
पंचप्राणात स्थिरावली छबी तुझी
मनमुराद भुलवण तुझ्या सुंदर रूपाची
इथेच!मला सोडून जाऊ नकोस
मातीत या आठवांचे आगार शोधता
थकलो रे!मला सोडून जाऊ नकोस
संपन्न हिरवाईची पालखी वाहता वाहता
तुझ्याकरताच उरलं जगणं माझं
हल्ली!अबोल झालो मी!सारे निघून गेले
तुझ्यावाचून आता कोण उरलं माझं
सोडुन जाऊ नकोस.. कुणी नाही माझं…!!
बाबा ठाकूर धन्यवाद
गुलकंद..ठाकूरी उवाच..तीन.