You are currently viewing झोळंबे येथे शेत विहिरीत पडून महिलेचा मृत्यू

झोळंबे येथे शेत विहिरीत पडून महिलेचा मृत्यू

झोळंबे येथे शेत विहिरीत पडून महिलेचा मृत्यू

दोडामार्ग

तळकट येथील महिला झोळंबे येथे आपल्या शेत जमिनीतील नारळ व फोपळीच्या बागेत कामासाठी गेली असता, बागेत काम करत असताना तोल जाऊन बागेमध्ये असलेल्या विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दि-२६ जानेवारी रोजी सकाळी १०:३० च्या दरम्यान झोळंबे येथे घडली आहे. मानसी मनोहर देसाई (वय-३८) असे मृत महिलेचे नाव आहे.

मानसी हिचा पती गोव्यातील एका स्कुल बसवर कामाला आहे. तो घरी आला असता त्याला आपली पत्नी घरी दिसली नाही. यावेळी त्याने शोध घेतला, मात्र, ती कुठेच दिसली नाही. यावेळी ती बागायतीत तर गेली नाही ना याची शेजारी चौकशी केली. त्यावेळी ती बागयतिच्या दिशेने जाताना एकाला दिसली होती. त्यावेळी तिच्या पतिने त्या बागयतीत शोध घेतला, त्यावेळी ती शेतविहिरीत मृत असल्याची निदर्शनास आली. यावेळी दोडामार्ग पोलिसांना याबाबत माहिती दिली असता घटना स्थळी पोलीस दाखल होऊन मृतदेह बाहेर काढण्यात आला. तिच्या पश्चात पती, दोन मुलगे असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा