You are currently viewing स्मार्ट आणि प्रीपेड मीटर विरोधात १० फेब्रुवारीला कुडाळात मोर्चा…

स्मार्ट आणि प्रीपेड मीटर विरोधात १० फेब्रुवारीला कुडाळात मोर्चा…

स्मार्ट आणि प्रीपेड मीटर विरोधात १० फेब्रुवारीला कुडाळात मोर्चा…

कुडाळ

अदानी आला घराला, स्मार्ट वीज मीटर आपल्या दाराला… कात्री आपल्या खिश्याला असा नारा देत स्मार्ट आणि प्रीपेड वीज मीटरच्या विरोधात वीज ग्राहक संघर्ष समिती आणि वीज ग्राहकांच्या वतीने येत्या १० फेब्रुवारीला कुडाळ येथील महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. वीज ग्राहक संघर्ष समितीचे राज्य निमंत्रक संपत देसाई यांनी दिली.

कुडाळ येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी महाविकास आघाडीचे इर्शाद शेख, अमित सामंत, संजय पडते आदी उपस्थित होते. त्यांनी सुद्धा या मोर्चाला सक्रिय पाठिंबा दर्शविला असल्याचे सांगितले. दरम्यान त्या आशयाचे निवेदन त्यांनी आज अधीक्षक अभियंता कार्यालयात दिले. हा मोर्चा सरकार विरोधात नसून सरकारच्या धोरणाविरुद्ध असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी बोलताना संपत देसाई म्हणाले, महावितरण कंपनीचे खाजगीकरण रोखण्यासाठी आणि अदानीच्या घश्यात जाणारी एमएससीबी वाचवण्यासाठी महावितरण स्मार्ट मीटर बसल्यास अधिक गतीने पळणारआहे, विजेचे दर वाढणार आहेत, तुमची आमची लुटमार होणार हे रोखण्यासाठी हा मोर्चा आहे. घरातील जुने मीटर व्यवस्थित असतानाही ते काढून स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्याचा ठेका अदानी उद्योग समूहाला दिला आहे. . मुंबई सह प. महाराष्ट्र अदानीच्या ताब्यात जाणार हे ताबडतोबीने थांबवण्यासाठी हा मोर्चा आहे. तसेच ताल्कालीन उर्जा मंत्री व सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सामान्य माणसाला दिलासा म्हणून ३ जुलैला कोणत्याही प्रकारे सर्वसामान्य ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यात येणार नाही अशी ग्वाही दिली होती. तरीही अदानी समूहाने जबरदस्तीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात खाजगी नोकर भरती करून, ग्राहकाना न सांगता मीटर बसवणे चालू केले आहे. तसेच नवीन वीज जोडणीसाठी स्मार्ट प्रीपेड मीटर सक्तीचे करण्यात येत आहे. हे थांबवण्यासाठी येत्या १० फेब्रुवारीला हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे संपत देसाई यांनी सांगितले.

या मोर्चाला महाविकास आघाडीचे घटक पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख आणि उबाठा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी आपली भूमिका जाहीर करून मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

यावेळी अतुल बंगे, बबन बोभाटे, अमरसेन सावंत, दीपक जाधव, अंकुश कदम, प्रकाश मोरुस्कर, मारुती पाटील, सहदेव पावसकर, मंगेश बांदेकर, अरुण परुळेकर, दिलीप परुळेकर, महादेव पावसकर, मयुरेश देसाई, राहुल कदम, संजय पारसेकर, मंगेश तळवणेकर, संतोष तर्फे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा