*पिंपरी न्यायालयात बार असोसिएशनतर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*
पिंपरी
७६ वा प्रजासत्ताकदिन पिंपरी न्यायालयात पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनतर्फे मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. २६ जानेवारी १९५० मध्ये संविधान स्वीकारून भारत देश जगातील सर्वात मोठा लोकशाहीप्रधान देश म्हणून नावारूपास आला. पिंपरी न्यायालयात आयोजित कार्यक्रमाची सुरुवात ही पोलीस बांधवांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन केली. पिंपरी न्यायालयाचे न्यायाधीश एम. जी मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच उपस्थित असणारे सर्व न्यायाधीश, पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे सर्व वकील, सरकारी वकील, न्यायालयीन कर्मचारी आणि उपस्थित नागरिक यांच्यामार्फत भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी पिंपरी न्यायालयाचे न्यायाधीश एम. जी मोरे यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
प्रजासत्ताक दिन हा फक्त स्वातंत्र्याचा उत्सव नाही, तर एकता, बंधुता आणि सामूहिक कर्तव्यांचे प्रतीक आहे. या दिवशी सर्व देशवासीय एकत्र येऊन आपल्या देशाच्या भविष्यासाठी वचनबद्ध होतात, असे मत पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज यांनी व्यक्त केले. यावेळी ध्वजवंदनासाठी जिल्हा न्यायाधीश एस. बी. राठोड, प्रथम न्यायदंडाधिकारी एम.जी.मोरे, एल.अमुदी, एस. एस. चव्हाण, व्ही. एन. गायकवाड, एस. एन. गवळी, एस. एस. भगत, शेख साहेब, व्ही. एस. डामरे यांच्यासह पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. एस. बी. चांडक, ॲड. सुदाम साने, ॲड. सुहास पडवळ, ॲड. राजेश पुणेकर, ॲड. रामराजे भोसले, उपाध्यक्ष ॲड. अतुल अडसरे, ॲड. योगेश थंबा, ॲड. दत्ता झुळुक, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. संगीता परब, मा. सचिव ॲड. धनंजय कोकणे यांच्यासह मोठ्या प्रमाणात वकील बांधव, सरकारी वकील, सर्व न्यायालयीन कर्मचारी, पोलीस बांधव व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज, सचिव ॲड. उमेश खंदारे, महिला सचिव ॲड. रिना मगदुम, सहसचिव ॲड. राकेश जैद, खजिनदार ॲड. अक्षय फुगे, हिशेब तपासनीस ॲड. शंकर घंगाळे, सदस्य ॲड. संकेत सरोदे, सदस्य ॲड. विकास शर्मा, ॲड. मानसी उदासी, ॲड. सीमा शर्मा यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव ॲड. उमेश खंदारे यांनी केले. ॲड. मानसी उदासी यांनी आभार मानले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
_____________________________
*संवाद मिडिया*
*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2025-26)
*MHT- CET 2025* *क्रॅश कोर्स*
12 वी science च्या विद्यार्थ्यांसाठी.
Sub..*PCM / PCB*
बॅच सुरू..*1 मार्च 2025 पासून.*
https://sanwadmedia.com/160963/
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
बॅच सुरू.. *1 एप्रिल 2025 पासून.*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30* ( अभ्यंकर कुलकर्णी ज्यू. कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी)
*दुपारी 1.30 ते 4.30* ( शिर्के, पटवर्धन, फाटक आणि नवनिर्माण कॉलेज च्या विद्यार्थांसाठी )
========================
*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, Maths English*
बॅच सुरू.. *1 एप्रिल 2025 पासून*
Btach timing
*सकाळी 9 वाजता* ( अभ्यंकर कुलकर्णी ज्यू कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी)
*दुपारी 1.30 वाजता* ( शिर्के, पटवर्धन आणि फाटक कॉलेज च्या विद्यार्थ्यांसाठी )
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *15 एप्रिल 2025 पासून*
========================
🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
(16 वर्ष यशस्वीतेची )
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
8208702704
ऑफिस 9422896719
*Advt
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*