कारिवडे-पेडवेवाडीतील श्री देव हेळेकराचा ३० जानेवारीला जत्रौत्सव….
सावंतवाडी:
कारिवडे-पेडवेवाडी येथील श्री देव हेळेकर देवस्थानचा वार्षिक जत्रौत्सव गुरूवारी ३० जानेवारीला होत आहे.
यानिमित्त नवस बोलणे, फेडणे तसेच देवाच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी होते. रात्री उशिरा वालावलकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पेडवेवाडी ग्रामस्थांनी केले आहे.