न्हावेली येथील रस्त्याप्रश्नी अक्षय पार्सेकर यांचे उपोषण स्थगित..
ग्रामसडकच्या अधिकाऱ्यांकडून दखल ; जेसीबी पाठवून केली गटाराची खोदाई…
सावंतवाडी
न्हावेली येथील मुख्यमंत्री ग्रामसडक रस्त्याच्या डागडुजी संदर्भात कार्यकारी अभियंता श्री. चव्हाण यांनी स्वतः लक्ष घालून येत्या काही दिवसात काम करण्याचे आश्वासन दिल्याने तसेच त्वरित ठेकेदाराने जेसीबी पाठवून गटार खोदाई करून दिल्याने उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी २६ जानेवारीला उपोषणाचा घेतलेला निर्णय अखेर मागे घेतला आहे. शिरोडा सावंतवाडी महामार्गाला लागून न्हावेली माऊली मंदिर कडे जाणारा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जून २०२१ मध्ये नव्याने करण्यात आला होता. पाच वर्ष रस्त्याचे दायित्व असतात हा रस्ता वर्षभरानंतर खड्डेमय बनला आहे. या रस्त्याची डागडूजी तसेच गटार अन्य गोष्टींकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याने तसेच संबंधित विभागाकडून ठेकेदाराला पाठीशी घालण्यात येत असल्याने उपसरपंच श्री. पार्सेकर यांनी उपोषण छेडण्याचा इशारा दिला होता.
त्यांच्या इशाऱ्यानंतर खडबडून जागे झालेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक विभागाच्या कार्यकारी अभियंता श्री. चव्हाण यांनी तात्काळ उपसरपंच श्री. पार्सेकर यांना फोन करून उपोषण न करण्याची विनंती केली. रस्त्यावरील पडलेले खड्डे तसेच गटार व झाडी आदी येत्या काही दिवसात करून देतो, असे ग्वाही दिली. तसेच ठेकेदाराकडे तात्काळ जेसीबी पाठवून गटार खुदाई करून दिली. श्री. चव्हाण यांनी दिलेल्या आश्वासनाअंती श्री. पार्सेकर यांनी अखेर २६ जानेवारीला उपोषणाचा घेतलेला निर्णय मागे घेतला आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या आश्वासनाची पूर्तता येत्या काही दिवसांनी न झाल्यास आपण पुन्हा उपोषणाचा निर्णय घेऊ, असा इशाराही श्री. पार्सेकर यांनी दिला आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous article
जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग येथे २८ ला सिलंम्बम व शालेय थाई बॉक्सिंग स्पर्धा…
Next article
कोमसापच्या माध्यमातून सावंतवाडीत लवकरच साहित्य संमेलन….

Breaking Malvani