You are currently viewing जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग येथे २८ जानेवारी ला सिलंम्बम व शालेय थाई बॉक्सिंग स्पर्धा

जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग येथे २८ जानेवारी ला सिलंम्बम व शालेय थाई बॉक्सिंग स्पर्धा

जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग येथे २८ जानेवारी ला सिलंम्बम व शालेय थाई बॉक्सिंग स्पर्धा

इच्छुक शाळांनी ऑनलाइन एंन्ट्री व प्रवेशिका फी भरून या स्पर्धेत सहभागी व्हावे

सिंधुदुर्ग

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग तसेच सिंधुदुर्ग जिल्हा सिलंबम असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ जाने २०२५ रोजी सकाळी ठिक ९:०० वाजता जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग या ठिकाणी सिलंम्बम ( लाठी काठी ) व शालेय थाई बॉक्सिंग या शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले आहे.
सदर खेळ प्रकार हे विनाअनुदानित असून जिल्हा असोसिएशन व क्रीडा विभाग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा घेण्यात येत आहेत.
सदर स्पर्धेकरिता प्रवेशिका भरण्याची लिंक सुरु करण्यात आलेली आहे
इच्छुक शाळांनी ऑनलाईन एंट्री व प्रवेशिका फी भरून या स्पर्धेत सहभागी व्हावे …

दोन्ही स्पर्धा एकाच दिवशी घेण्यात येत असून जास्तीत जास्त खेळाडूंनी या सहभागी असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा सिलंबम व सिंधुदुर्ग जिल्हा थाई बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष लेफ्टनंट विवेक राणे तसेच राष्ट्रीय थाय बॉक्सिंग खेळाडू कु. मृणाल मलये व राष्ट्रीय सिलंबम खेळाडू व पंच कु. चित्राक्षा मुळये यांनी केले आहे.

Tagged: #बॉक्सिंग स्पर्धा#

प्रतिक्रिया व्यक्त करा