You are currently viewing बांदा केंद्र शाळेत राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जनजागृती

बांदा केंद्र शाळेत राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जनजागृती

*बांदा केंद्र शाळेत राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जनजागृती*

बांदा

पंधराव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त बांदा येथील पीएम श्री जिल्हा परिषद केंद्र शाळेत मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी आपले मत-आपला हक्क, मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी वेळ काढा, सुजाण नागरिक बनण्याची जबाबदारी पार पाडा अशा घोषणा देत प्रभातफेरी काढण्यात आली.यावेळी मुख्याध्यापक शांताराम असनकर,बांदा केंद्र स्तरीय मतदार अधिकारी जे.डी.पाटील, पदवीधर शिक्षक उदय साबळ,उपशिक्षक रंगनाथ परब , फ्रान्सिस फर्नांडिस आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा