जि. प. प्राथ. शाळा सावंतवाडी नं. ६ चे वार्षिक स्नेहसंमेलन उद्या 26 रोजी
सावंतवाडी
कै. श्रीम. लक्ष्मीबाई मुरारी माधव विद्यालय
जि. प. प्राथ. शाळा सावंतवाडी नं. ६ येथे उद्या दि. २६ जानेवारी २०२५ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
आपल्या देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त आपल्या शाळेचे ध्वजारोहण, स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा रविवार दि. २६ जानेवारी २०२५ रोजी संपन्न होत आहे. तरी कृपया सदर सोहळ्यास उपस्थित रहावे अशी विनंती करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान. श्री. राजू भालेकर (सामाजिक कार्यकर्ते), प्रमुख उद्घाटक : मान. श्री. सुधीरजी आडीवरेकर (माजी आरोग्य सभापती नगरपरिषद, सावंतवाडी) असणार आहे.
मान. श्रीम. दिपाली दिलीप भालेकर (माजी नगरसेविका)मान. श्री. राजाराम पवार (मुख्या. वि. स. खांडेकर हायस्कूल) मान. श्री. कमलाकर ठाकूर (केंद्रप्रमुख केंद्र सावंतवाडी) यांची प्रमुख उपस्थिती राहील.
या कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे
रविवार दि. २६/०१/२०२५
• सकाळी ८.०० वा.ध्वजारोहण सोहळा
• सकाळी ९.०० ते १० वा.हळदीकुंकू कार्यक्रम
• सायं. ४ ते ५ वा.मान्यवरांचे स्वागत व सत्कार, पारितोषिक वितरण
• सायं. ५.३० वा.ध्वजावतरण
• सायं. ५.३५ वा. ते ७.00 वा.विद्यार्थी विविध गुणदर्शनपर कार्यक्रम
• रात्री ७.०० वा. ते ७.३० वा.खास आकर्षण दिपोत्सव
• रात्री. ७.३० वा. ते ९.०० वा. सुमधूर भावगीतांवर आधारीत
रघुकुल स्वरविहार सावंतवाडी प्रस्तुत स्वरसांज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
श्रीम. समिक्षा खोचरे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, मान. श्री. दिलीप भालेकरशिक्षण तज्ञ
कु. मेघा चव्हाण – मुख्यमंत्री, कु. संध्या गौंड सांस्कृतिक मंत्री, माता पालक संघ • शिक्षक पालक संघ • मुख्याध्यापक • शिक्षक वृंद, जि. प. प्राथ. शाळा सावंतवाडी नं. ६ सर्वांनी वरील कार्यक्रमास उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.