शब्द पाकळ्या
मनातील विचार शब्दरूपी उतरवणे,
याहूनी नसते अजुनी काही वेगळे.
आपण फक्त एकच करणे,
शब्दांना मिळालेली दादच घेणे.
मन आपुले विचारांचं वारूळ,
बाहेरूनी भक्कम आतून पोकळ.
बहरलेल्या मनातील बहर,
मनांपर्यंत शब्दातून पोचवणे.
गद्य असो वा पद्य सारे,
शब्द फुलांनी सहजच मांडणे.
अंतःकरणातील शब्द पाकळ्या,
चांदण्यासम शिंपित जाणे.
शब्द शब्द ते गुंफूनी गेले,
सुविचारांचे जणू हार बनले.
कितीक विचार वाटुनी झाले,
शब्दरूपी हृदयी विचारच उरले.
(दिपी)✒️
दीपक पटेकर
८४४६७४३१९६