You are currently viewing जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत  ‘न्याय आपल्या दारी’

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत  ‘न्याय आपल्या दारी’

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत  ‘न्याय आपल्या दारी’

सिंधुदुर्गनगरी

 राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार दि.3 फेबुवारी 2025 ते 1 मार्च 2025 या कालावधीमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यामार्फत  ‘न्याय आपले दारी’ या संकल्पनेतून मोबाइल लोक अदालत व  फिरते विधी  सेवा केंद्र या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात मोबाईल व्हॅनव्दारे कायदेविषयक शिबीरे व मोबाईल लोक अदालत घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक यांनी दिली आहे.

            या मोबाईल व्हॅनमधुन घ्यावयाच्या कार्यक्रमांचे उद्घाटन दि. 3 फेब्रुवारी  रोजी  जिल्हा न्यायालय सिंधुदुर्ग येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकर अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे.

            मोबाइल लोक अदालत ग्रामपंचायत वाडीहुमरमळा, माणगांव, कोलगांव, साटेली-भेडशी, आरवली, आनंदव्हाळ, शिरगांव, खारेपाटण व ग्रामन्यायालय वैभववाडी येथे घेण्यात येणार आहेत. या मोबाईल व्हॅन लोक अदालतमध्ये सहभागी होऊन आपले दाखलपूर्व व प्रलंबित वाद सामोपचाराने कायमचे मिटवावे.

तसेच विधी सेवा प्राधिकरणामार्फत देण्यात येणाऱ्या मोफत कायदेविषयक सेवांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी कायदेविषयक जागृती करण्यासाठी पणदूर, झाराप, तेर्सेबांबर्डे, सांगेली, कळणे, उभादांडा, हडी, वाघोटण, वाडा हायस्कूल, सातरल, हरकूळ खुर्द व येडगांव या गावांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर कायदेविषयक शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामध्ये सहभागी होऊन विधी सेवा प्राधिकरणामार्फत देण्यात येणाऱ्या मोफत कायदेविषयक सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव संपूर्णा के. कारंडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा