वेंगुर्लेतील रस्ता सुरक्षितता मोहिम उद्घाटन प्रसंगी पोलिस निरीक्षक मोरे यांचे प्रतिपादन…
वेंगुर्ला
रस्ते सुरक्षिततेबाबत दिलेल्या नियमांचे पालन केल्यास अपघात टळतील व लोकांना सुरक्षित प्रवास करणे शक्य होईल. एस.टी.चा प्रवास हा सुरक्षित प्रवास याबाबतचा जन मानसातील विश्वास वृद्धिगत होऊन लोक एस.टी.तून प्रवास करतील असे प्रतिपादन वेंगुर्ला पोलिस निरिक्षक तानाजी मोरे यांनी केले.
राज्य परिवहन महामंडळाच्या वेंगुर्ला आगारात रस्ता सुरक्षितता मोहिम सन २०२१ या कार्यक्रमाचे उद्घाटन वेंगुर्ला पोलिस निरिक्षक तानाजी मोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी एस टीचे सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक एस.आर.मुणगेकर, सहाय्यक वाहतूक निरिक्षक एन.डी.वारंग, विभागीय भांडार अधिकारी शिदे, पोलिस कर्मचारी सुरेश पाटील, परशुराम सावंत, नितीन चोडणकर, वाहतुक पोलिस मनोज परुळेकर, पप्पू खडपकर आदी उपस्थित होते.
सुरक्षितता मोहिम सन २०२१ ही दि.१८ जानेवारी २०२१ ते १७ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत राबवायची असून सर्व कर्मचा-यांनी त्यात सहभागी होऊन सदरची मोहिम यशस्वी करण्याचे आवाहन श्री. शिदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम कांबळी यांनी तर आभार धनश्री तांडेल यांनी मानले.