You are currently viewing दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न

दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न

*दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न*

सिंधुदुर्ग

महात्मा गांधी सेवा संघ संचलित दीव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्गच्या वतीने गुरुवार दिनांक 23/01/2025 रोजी माडखोल पंचक्रोशीतील सर्व दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा सकाळी 10.00 वाजता संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये माडखोल गावचे उपसरपंच मा. तुषार सामंत, अतुल बंगे, संजय पडते, हरेश नेमलेकर, मा. अंजली वालावलकर मॅडम, झाराप विद्यालयाचे आरोस्कार सर, जिल्हा सम्वयक अनिल शिंगाडे सर, तसेच संस्था कर्मचारी संजना गावडे, प्रणाली शिर्के, विशाखा कासले, दीपक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या वतीने दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच जिल्हा समन्वयक अनिल शिंगाडे सरांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले. तसेच वालावलकर मॅडम यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले. उपसरपंच तुषार सामंत यांच्या सहकार्यातून उपस्थित बांधवाना भेटवस्तू वाटप करण्यात आल्या. या मेळाव्याला 40 हून जास्त दीव्यांग उपस्थित होते. हरेश नेमलेकर व तुषार सामंत यांच्या मांध्यमातून उपस्थित दिव्यांग बांधवांना उपहार देण्यात आला.तसेच पुनर्वसन केंद्राच्या वतीने स्वप्नील विजय पालव यांना कानाची मशीन देण्यात आली. झाराप विद्यालयाचे आरोस्कर सर यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले

प्रतिक्रिया व्यक्त करा