You are currently viewing वेंगुर्ले तालुक्यातील मठ ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजपाचे संतोष वायंगणकर यांची बिनविरोध निवड

वेंगुर्ले तालुक्यातील मठ ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजपाचे संतोष वायंगणकर यांची बिनविरोध निवड

*वेंगुर्ले तालुक्यातील मठ ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजपाचे संतोष वायंगणकर यांची बिनविरोध निवड*

*भाजपा वेंगुर्लेच्या वतीने नवनिर्वाचित उपसरपंच संतोष वायंगणकर यांचे अभिनंदन !!!*

पक्षाच्या ध्येयधोरणानुसार मठ उपसरपंच महादेव गावडे यांची मुदत संपल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर भाजपाचे संतोष शशिकांत वायंगणकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल भाजपा वेंगुर्लेच्या वतिने जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई व तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले .
यावेळी ता.सरचिटणीस पपु परब व बाबली वायंगणकर , सोसायटीत चेअरमन सुभाष बोवलेकर , युवा नेते अजित नाईक , युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर , शक्तिकेंद्र प्रमुख विजय बोवलेकर , बुथप्रमुख सुधीर पालयेकर , बुथप्रमुख अनिल तेंडोलकर व उमेश धुरी , रविंद्र खानोलकर , महेश धुरी उपस्थित होते .
सरपंच सौ.रुपाली नाईक यांनी सर्वप्रथम उपसरपंच संतोष वायंगणकर यांचे अभिनंदन करुन त्यांना खुर्चीवर विराजमान केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सिद्धी गावडे – शमिका मठकर – सोनिया मठकर – महादेव गावडे उपस्थित होते . माजी सरपंच धोंडु गावडे , अनंत वायंगणकर , निवृत्ती आरमारकर , उमेश मठकर , शिवप्रसाद सावंत , गुणाजी परब यांनीही नवनिर्वाचित उपसरपंचांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

प्रतिक्रिया व्यक्त करा