सिंधुदुर्गनगरीत २६ जानेवारी २०२५ रोजी दिव्यांग बांधवांचा आंदोलनाचा इशारा
दीव्यांग कृती संघर्ष समिती सिंधुदुर्ग याच्या वतीने दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी दीव्यांग बांधवांच्या समस्या सोडविण्याचा उद्देश.
१: संजय गांधी पेन्शन १५०० वरून ६००० करण्यात यावी.
२: दिव्यांगांसाठी वीणा अट घरकुल योजना मंजूर करण्यात याव्या.
३: सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दीव्यांग भवन मिळावे.
४: दीव्यांग बांधवांना घरपट्टीमध्ये शासन निर्णयानुसार ५०% सवलत मिळावी
5: दिव्यांगाना व्यवसायाकरता शासकीय जागेमधून जागा उपलब्ध करून देण्यात यावी.
6. दीव्यांग भरतीमधील शासकीय अनुशेष त्वरित भरावा
7. जिल्हा समाजकल्याणमधील रिक्त पदे त्वरीत भरण्यात यावी.
8. समाजकल्याण योजनांची वयोमर्यादा वाढवावी
9. दिव्यांगाचे स्वलंबन कार्ड समाजरूग्णाल्यातून ओरोस मधून वेळेत मिळावे
10. दिव्यांगांचे पूर्वीचे प्रमाणपत्र 40% पेक्षा जास्त असूनही ऑनलाईन केल्यानंतर त्याची टक्केवारी कमी केली जाते ती केली जाऊ नये.
11. सीव्हीला डोळे तपासणी समधित मशीन नसल्याने दिव्यांगणा नाहक खासगी डॉक्टरचा भुदांड भरावा लागतो
या व आदी दिव्यांगाच्या समस्याअसून या साठी दिनांक 26 जानेवारी2025
रोजी दिव्यांग कृती संघर्ष समिती सिंधुदुर्ग यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठीक सकाळी 7 वाजता ढोल बजाव जाहीर आंदोलन करण्यात येणार आहे.तरी आंदोलनात बहुसंख्येने दिव्यांगबांधवांनी उपस्थित राहावे. असे आवाहन दिव्यांग कृती संघर्ष समिती अध्यक्ष यांच्या वतीने करण्यात येत आहे.