*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वी देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
।।गण गण गणात बोते ।। जय गजानन श्री गजानन ।।
___________________________
श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – ८२ वे
अध्याय- १४ वा , कविता – ४ थी
___________________________
स्वामी बोलले चौघांना । मज आग्रह करू नका ना । हट्ट तुमचा थांबवा ना । येत नाही मी तुमच्या सवे ।। १ ।।
नर्मदा आहे इथे । स्नान नर्मदेचे करी रोज इथे। कशाला मग जाऊ तिथे। रागावेल नर्मदा माझ्यावरी ।। २ ।।
तरी चौघांनी हट्ट नाही सोडला । म्हणती-स्वामी तुम्ही हो चला । स्वामी बोले शिष्याला । घडता काही विपरीत,
देऊ नका दोष आम्हाला ।। ३ ।।
शिष्यांसवे स्वामी निघाले ।ओंकारेश्वरी सारे आले ।
पर्व उत्सवाचे पाहू लागले । चौघेजण आनंदाने ।।४ ।।
क्षेत्री ओंकारेश्वर । रम्य सारा परिसर । नर्मदेच्या काठावर।
स्वामी बैसती ध्यान लावूनी ।। ५ ।।
चौघे शिष्य संतोषले । फार छान हो झाले । पर्वकाली
ओंकारेश्वर दर्शन घडले ।आम्हा, गजानन कृपेने ।। ६ ।।
__________________________
करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास
___________________________
कवी अरुणदास- अरुण वि.देशपांडे – पुणे.
___________________________