मनसेने दिलेल्या आंदोलन इशाऱ्यानंतर झाराप पत्रदेवी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास प्रारंभ !
कुडाळ
झाराप पत्रदेवी येथील रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेले खड्डे आठ दिवसात न बुजविल्यास आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभाग जागा झाला. या पटप्प्यातील खड्डे बुजविण्यास सुरूवात करण्यात आली. मनसे सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. झाराप झिरो पॉईंट ते पत्रादेवी टप्प्यात ठिकठिकाणी पडल्याने रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला होता. हे जीवघेणे खड्डे अपघातांना निमंत्रण देत होते. दरम्यान हे खड्डे पंधरा दिवसातन बुजविल्यास ‘मनसे स्टाईल’ आंदोलन छेडण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला दिला होता. याची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने खड्डे बुजविण्यासाठी प्रारंभ केला आहे.