You are currently viewing बेकायदेशीर चालू असलेली कळ्या दगडाची खाण बंद करण्यासाठी परमे ग्रामस्थांचे २६ जानेवारी रोजी उपोषण

बेकायदेशीर चालू असलेली कळ्या दगडाची खाण बंद करण्यासाठी परमे ग्रामस्थांचे २६ जानेवारी रोजी उपोषण

बेकायदेशीर चालू असलेली कळ्या दगडाची खाण बंद करण्यासाठी परमे ग्रामस्थांचे २६ जानेवारी रोजी उपोषण

परमे ग्रामस्थांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

दोडामार्ग

तालुक्यातील परमे येथे सुरू असलेल्या कळ्या दगडाच्या खाणीबाबत परमे ग्रामस्थांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांना पत्र देत २६ जानेवारी रोजी उपोषणाला बसणार असल्याचे पत्रात सांगितले आहे.

दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, परमे येथे सर्वे क्र. १०३/१ व १०४/१ येथे श्री.मे. एम. व्यंकटराव इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा.लि. तर्फे मुफन्ना रामकृष्ण प्रसादराव रा. मिरामर पणजी गोवा यांची काळा दगड काढण्याची खाण पूर्णता बंद करण्यात यावी. सदर खणीस कोणत्याही प्रकारची ग्रामसभेची किंवा मासिक सभेची परवानगी नाही. सदर क्रशर कायमस्वरूपी बंद करण्यात यावा असा ठराव दिनांक १३ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत बहुमताने समंत करण्यात आला. श्री. ए. एस. आर. एंटरप्रायझेस यांनी सदर खडी क्रशर चालू करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाकडे अर्ज केला होता, त्या अर्जावर निर्णय घेण्यासाठी दि. ३० डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या ग्राम सभेत सदर खडी क्रशर कायमस्वरूपी बंद करण्यात यावा असा एक मताने ठराव समंत करण्यात आला.

सदर क्रशर चालू झाल्यापासून गावात अनेक ठिकाणी भुस्खलन झालेले आहे. सर्व ग्रामस्थांचे मत आहे की सदर बेकायदेशीर खडी क्रशर चालू राहिली तर त्या पासून गावाला धोका निर्माण होणार आहे. परमे गावाचे अस्तित्व नष्ट होणार आहे. सदर खडी क्रशर वर मोठे स्फोट होत असल्याने ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण होऊन पर्यावरणावर व आमच्या जीवन मानावर विपरीत परिणाम होत आहे ज्या भागात चालू असलेला खडी क्रशर हा वस्ती पासून १ किमी वर असून घरे त्या लगतच डोंगराच्या पायथ्याशी आहेत. ज्या प्रमाणे एका रात्रीत पुणे जिल्ह्यातील माळींन, रायगड जिल्ह्यातील तीळ्ये आणि २०२४ मधील केरळ राज्यातील वायनाड गांव पूर्णपणे भुस्खलनामुळे नष्ट झाले. त्या प्रमाणे परमे गाव सुद्धा सदर खडी क्रशर चालू राहिल्यास पूर्णपणे नष्ट होण्याचा धोका आहे. या प्रकारचे संकट येऊ नये या दूरदृष्टीकोनातून अशा बेकायदेशीर चालू असलेल्या खडी क्रशर गावातील लोकांचा विरोध दर्शविला आहे.

या प्रकल्पामुळे जंगलातील श्चापदे लोकवस्तीत घुसून लोकांवर हल्ले करत आहे. याच उदाहरण १४ फेब्रुवारी २०१९ रोजी बिबट्याने तिघांवर जीवघेणा हल्ला करून जखमी व जायबंदी केले होते. या प्रकल्पामुळे फेब्रुवातील गवारेडे, सांबर, वाघ असे अनेक प्राणी लोकवस्तीत येत असल्यामुळे मानवी जीवनावर धोका निर्मााणे झाला आहे.खडी क्रशर परमे गावातील गोरगरीब शेतक-यांच्या पारंपारिक शेती व्यवसाय, काजू बागायती धोक्यात आलेल्या आहे. हा प्रकल्प असाच चालू राहील शेतात भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होऊन गावात तीव्र पाणी टंचाई होऊ शकते.खडी क्रशर कायमस्वरूपी बंद न झाल्यास परमे ग्रामस्थ दि. २६ जानेवारी २०२५ रोजी गावातून वाहतूक होत असलेल्या रस्त्याच्या बाजूला उपोषणाला बसणार असे निवेदन परमे ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा