You are currently viewing चराठा प्रिमियर लीग २०२५ क्रिकेट स्पर्धेत मीत स्पोर्ट्स विजेता तर रोहित स्पोर्ट्स उपविजेता

चराठा प्रिमियर लीग २०२५ क्रिकेट स्पर्धेत मीत स्पोर्ट्स विजेता तर रोहित स्पोर्ट्स उपविजेता

सावंतवाडी :

चराठा प्रिमियर लीग २०२५ (सि पी एल) या क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम अटीतटीच्या रोमहर्षक सामन्यात मीत स्पोर्ट्सने रोहित स्पोर्ट्सवर मात करीत या स्पर्धेच्या ७ व्या पर्वाचे विजेतेपद पटकावले. तर रोहित स्पोर्ट्सला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

या क्रिकेट स्पर्धेत गजानन स्ट्रायकर्स (राजू कुबल रोहित कुबल), रोहित स्पोर्ट्स (राहुल परब), मीत स्पोर्ट्स (चंद्रकांत वेजरे, रवी कळंगुटकर), होलीक्रॉस टायगर्स (मिनिन फर्नांडिस), सातेरी महापुरुष ११ (प्रथमेश नाईक शशिकांत पिळणकर, आदित्य नाईक), पारिजात स्पोर्ट्स (राजन गावडे पप्पू गावडे), एस एस स्ट्रायकर्स (प्रकाश फाले), गणपती वॉरियर्स (बबलू मसुरकर) या आठ संघाचे संघमालक व कर्णधार सहभागी झाले होते.

स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मीत स्पोर्टसने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारत रोहित स्पोर्टला फलंदाजीला पाचरण केले. रोहित स्पोर्टने पाच षटकात ५१ धावा केल्या. त्यानंतर पाच षटकात ५२ धावांचे आव्हान स्विकारून मैदानात उतरलेल्या मीत स्पोर्टसला रोहित स्पोर्टच्या अचूक गोलंदाजी व क्षेत्ररक्षणामुळे शेवटच्या षटकापर्यंत झुंज द्यावी लागली. मात्र अखेरच्या षटकात अभी विर्नोडकर याच्या घणाघाती फलंदाजीच्या जोरावर मीत स्पोर्टने अखेर विजय मिळवित या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. तर रोहित स्पोर्टला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

या स्पर्धेचे उद्घाटन चराठा गावातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. दोन दिवस चाललेल्या या क्रिकेट स्पर्धेला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अपवाद वगळता या स्पर्धेतील सर्व सामने अटीतटीचे झाल्यामुळे क्रिकेट रसिकांचे मनोरंजन झाले. या स्पर्धेत अभि विर्नोडकर, सुरज जाधव, नितेश परब, विठ्ठल कुबल, महेश शिर्के, रवी कळंगुटकर, रोहित परब, सद्गुरु चराठकर, प्रणिकेत मेस्त्री, मधुकर कुंभार, संतोष खरात, न्हानू बिर्जे, विराज बोंद्रे, सूरज कळंगुटकर, सिताराम धुरी, विशाल कांबळे, विशाल चराठकर, अविनाश जाधव, मिनिन फर्नांडिस, निखिल परब, अनिकेत चराटकर, पराग बोंद्रे आदींनी भेदक गोलंदाजीसह दमदार फलंदाजी आणि अफलातून क्षेत्ररक्षण करीत सर्वांचे लक्ष वेधले. त्यामुळे चराठा वासियांसाठी अभिमानास्पद आणि यादगार ठरली.

या स्पर्धेचे पारितोषिक वितरण चराठा गावातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी स्पर्धेतील विजेत्या मीत स्पोर्ट्सला १५ हजार रुपयाचे पारितोषिकासह आकर्षक चषक तर उपविजेत्या रोहित स्पोर्ट्सला १० हजार रुपयाच्या पारितोषिकासह आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेतील मालिकावीर, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांनाही ट्रॉफीसह रोख रकमेच्या पारितोषिकाने गौरविण्यात आले.

या स्पर्धेसाठी पंच म्हणून गजा हळदणकर आणि अजय जाधव यांनी काम पाहिले तर समालोचन निलेश गाड आणि नितीन गोलतकर यांनी केले. या स्पर्धेतील खेळाडू आणि प्रेक्षक यांच्या जेवणाची व्यवस्था चराठा गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थांनी केली.

या स्पर्धेतील प्रथम १५ हजार रुपयाचे पारितोषिक संतान फर्नांडिस यानी, द्वितीय १० हजार रुपयाचे पारितोषिक आयोजक यांनी तर विजेत्या व उपविजेत्या संघासाठी आकर्षक चषक चंद्रकांत दाजी वेजरे यांनी पुरस्कृत केले होते. तसेच या स्पर्धेतील पारितोषिके चराठा गावातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुरस्कृत केली होती. या स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनासह नियोजनाबाबत सहभागी संघांची शिस्तबद्धता याबाबत उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा