You are currently viewing मेंदूचा शापित हात….!!

मेंदूचा शापित हात….!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मेंदूचा शापित हात….!!*

 

अवकाशात उमटणारी छायाचित्र

एकेक करून अदृश्य झाली

काळोखात दडण्याची अनुमती

तिन्हीसांजेच्या कोंबड्याने दिली..

 

पिंज-याला नसतं पिंज-याचं भान

श्वासांचा कोंडमारा राहीला उरात

कैदखान्याला गज नाही उरलेत

बिऱ्हाडाने कोंडला!मेंदूचा शापित हात

 

दिव्यांना फुटली डोळ्यांची कवाडं

काळोखाचं घर उजेडाच्या गावात

जन्मभराची नासली दिवाळी नरकात

जन्म गेलाय देहाचे ऋण फेडण्यात

 

गर्भातलं भान गर्भातचं राहीलं

पाळण्याची दोरी ती हलवत होती

मरणाच भय कधीच निघून गेलं

आता फक्त! उरली जगण्याची भीती

 

काळ पुढे नाहीच सरकला

मेंदूचा शापित हात काळजावर

रक्तगंधी खुराड्याला जाग आली

फडफडणार काळीज जागलं कोंबडा आरवल्यावर……!!!!

 

बाबा ठाकूर

माझी British Council ने

अनुवादित केलेली रचना

प्रतिक्रिया व्यक्त करा