You are currently viewing श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे खाद्य महोत्सव संपन्न.

श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे खाद्य महोत्सव संपन्न.

श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे खाद्य महोत्सव संपन्न.

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे बुधवार दि.15/1/2025 रोजी खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. एकुण 36 स्टाॅल्स महाविद्यालयाच्या वतीने ऊपलब्द करुन देण्यात आले होते.यामध्ये
मोदक, खरवस, अळुवड्या,घावणे उसळ, आंबोळी, कोंबडी वडे, कोकम सरबत, सोलकढी, प्रॉन्स, चिकन असे विविध मालवणी पदार्थ विद्यार्थ्यानी तयार केले होते.
या खाद्य महोत्सवाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या विश्वस्त सौ.श्रद्धाराजे
भोंसले यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले , संस्थेचे सहाय्यक संचालक अॅड. शामराव सावंत, सदस्य श्री जयप्रकाश सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल, महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या महोत्सवामध्ये कोकणी पदार्था व्यतिरिक्त गुजराती, राजस्थानी पदार्थ विद्यार्थ्यांनी बनवलेले होते.
या खाद्य महोत्सवाला विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला.

प्रतिक्रिया व्यक्त करा